'त्या' लिंक रोडनंतर मुंबई-ठाण्याहून अर्ध्या तासात नवी मुंबईत

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला दोन लाखांहून अधिक वाहने धावतात. त्यामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रोजच मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील प्रस्तावित खारघर-तुर्भे लिंक रोडमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-ठाण्याहून अवघ्या ३० मिनिटांत खारघर किंवा नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे.

Mumbai
Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विविध विकासकामांचे लोकर्पण तसेच भूमिपूजन केले. यात घणसोली-ऐरोली खाडीपूल, अटल सेतू ते उलेव जंक्शन सागरी मार्ग, सिडकोचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, विमानतळास जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोडमार्गाचा समावेश आहे. यामध्ये तुर्भे ते खारघरपर्यंतच्या भुयारी मार्गाचा अर्थात बोगद्याचाही समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुसाट होईल. सध्या मुंबई-ठाण्याहून नवी मुंबईला खारघर किंवा नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी बराच वेळ खर्चिक होतो. मात्र आगामी ४ वर्षात खारघर तुर्भे लिंक रोडमुळे मुंबईकरांचा हा प्रवास सुखकर होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-ठाण्याहून अवघ्या ३० मिनिटांत खारघर किंवा नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे.

Mumbai
Mumbai : मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर सौंदर्यीकरणासाठी 280 कोटी; प्राचीन स्थापत्य शैली वापरणार

प्रस्तावित चौपदरी खारघर-तुर्भे लिंकरोड साधारण साडेपाच किमीचा असेल. यात एका बोगद्याचा देखील समावेश असणार असून याची लांबी सुमारे २ किमी असेल. खारघर-तुर्भे लिंक रोडमुळे नागरिकांना मोठा लाभ होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. कारण, सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला दोन लाखांहून अधिक वाहने धावतात. मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या मार्गावरुनच यावे लागते. मात्र आता खारघर-तुर्भे लिंक रोडमुळे ही वाहतूक कोंडी कमी होईल. खारघर-तुर्भे लिंक रोडाच्या कामाला सुमारे ३,२०० कोटी खर्च येणार आहे. या मार्गाला खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्योगिक वसाहत जोडली जाईल. या प्रकल्पांतर्गत तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगराखाली सुमारे २ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com