बंगळूर (Bangalore) : यापुढे रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदारांना रस्त्यांची पाच वर्षे देखभाल करावी लागणार आहे. तसा नवीन नियम करत असल्याची माहिती कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जारकीहोळी ते म्हणाले, ‘‘कंत्राटदारांवर रस्ते बनविण्याबरोबरच त्याची पाच वर्षे दुरुस्ती करण्याची जबाबदारीही राहील. यासाठी यापुढे निविदा मागवल्या जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागात सुधारणा करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदारांवर देखभालीची जबाबदारी दिली आहे. राज्यातील रस्त्यांचा विकास होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे येत्या काळात आमचे रस्ते विकसित करणाऱ्या कंत्राटदारांनी १५ वर्षे विकसित केलेल्या रस्त्यांची देखभाल करावी.’’