30 कोटी गुंतवा अन् मेट्रो चालवायला घ्या; गडकरींची भन्नाट ऑफर

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या (Nagpur District) शेजारचे जिल्हे, तसेच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) काही शहरांमध्ये ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा संकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करा आणि थेट मेट्रो रेल्वे (Meto Railway) चालवायला घ्या, अशी ऑफरच गडकरी यांनी व्यावसायिकांना दिली आहे.

Nitin Gadkari
मुंबई महापालिकेचे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी २९ कोटींचे टेंडर

मेट्रो रेल्वे चालवायला कोट्यशीध उद्योजक एका पायावर तयार आहेत. अनेकांनी आपल्याशी संपर्क साधला आहे. 'तुम्ही टेंडर काढा आणि आम्ही टेंडर भरतो,' असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आपल्या लोकांना उद्योगाची संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे, असे गडकरी म्हणाले. व्यावसायिकांसाठी ही चांगली संधी आहे. अवघ्या ३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मेट्रो रेल्वे चालवायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय सुद्धा भराभराटीला येईल, असे गडकरी यांचे म्हणणे आहे. नागपूरमध्ये झालेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यक्रमात गडकरी यांनी मेट्रो चालवण्यासाठी खुली ऑफर दिली.

Nitin Gadkari
मुख्यमंत्री शिंदे नांदेड जिल्ह्यावर प्रसन्न! तब्बल 192 कोटींच्या..

ब्रॉड गेज रेल्वे नागपूर - अमरावती, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - रामटेक, बैतूल, छिंदवाडा, वडसा या मार्गावर धावणार आहे. अशा १०० मेट्रो गाड्या सुरू करण्यात येणार आहे. यातून माल वाहतूकही करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक या क्षेत्रात आल्यास त्यांना चांगल्या परताव्यासोबत व्यवसायाची संधी उपलब्ध आहे. आज ट्रक वाहतुकीच्या व्यवसाय करणाऱ्यांना उपरोक्त शहरांमध्ये वाहतूक करताना किती खर्च येतो याचा अंदाज आहे. त्याशिवाय वेळ फार जातो. पन्नास ते सत्तर लाखांचा ट्रक विकत घ्यावा लागतो. व्यवसायासाठी एका ट्रकने भागत नाही. या खर्चाचा सारासरा विचार करता रेल्वे वाहतूक तुलनेत खूप किफायतशीर आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari
मुंबई मेट्रो-३ : पहिली ८ डब्यांची प्रोटोटाईप ट्रेन यशस्वी

बस पोर्ट, रोप-वे अन् केबल कार

देशभरात १०० बस पोर्ट तयार केले जाणार आहेत. ते बांधा आणि हस्तांतरण करा (PPP) या तत्त्वावर साकारण्यात येणार आहेत. तसेच रोप-वे व केबल कार, फायनाकुलर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. असे एकूण १६५ प्रकल्पांचे प्रस्ताव आलेले आहेत, असेही गडकरी यांनी या कार्यक्रमात सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com