पुण्यात 'या' कंपनीचा 4000 कोटींचा प्रकल्प; राज्यात गुंतवणुकीसाठी LG, LOTTE उत्सुक

Uday Samant
Uday SamantTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ‘‘ह्युंदाई कंपनीचा चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात येणार असून पहिला प्रकल्प पुण्यात उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल.जी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीही राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

Uday Samant
ST स्थानकांचा होणार कायापालट; अजितदादांनी लक्ष घातल्याने आता...

ते म्हणाले, ‘‘दक्षिण कोरियामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूहही पुण्यात ४७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला होता. द. कोरियाच्या दौऱ्यातील बैठकीत यावर संबंधितांशी नुकतीच चर्चा झाली. जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.’’

Uday Samant
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती! सरकार बॅकफूट वर

‘‘पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनिअम झाकणाचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी पाच एकर जागेची मागणी कंपनीने केली आहे. या प्रकल्पासाठी पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे या प्रकल्पास चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची एल.जी कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मानस आल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जे उत्पादन कोरियात होते, तसे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे,’’ असे सामंत यांनी सांगितले.

Uday Samant
Mumbai : 'त्या' वॉर्डमध्ये 7 पुलांसाठी 51 कोटींचे टेंडर

लॅकमेचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम

भारतात चार दारांच्या फ्रीजचे उत्पादन, पारदर्शी दूरचित्रवाणी संच, फोल्डेबल टिव्हीच्या सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याची विनंती सॅमसंग कंपनीला केली आहे. तसेच सौंदर्यप्रसाधन उत्पादनांसाठी डिसेंबर महिन्यात या क्षेत्रातील उद्योजकांचे मंडळ भारतात भेट देणार असून लॅकमे कंपनी राज्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. राज्यातील जे नागरिक दक्षिण कोरियात आहेत, त्यांना राज्यात गुंतवणूक करायची असेल, तर अशा उद्योजकांना नवीन सवलती देण्यात येतील, असे सामंत यांनी जाहीर केले.

Uday Samant
Mumbai : नालेसफाईच्या टेंडरमध्ये हेराफेरी करणारा 'तो' ठेकेदार ब्लॅकलिस्टेड

राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार

राज्यात यावर्षीपासून उद्योगरत्न, उद्योग मित्र, मराठी उद्योजक व महिला उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पहिला सोहळा येत्या २० रोजी बीकेसीतील (मुंबई) जिओ सेंटर येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर झाला आहे. उद्योग मित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील सह्याद्री समूहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा किर्लोस्कर समुहाच्या गौरीताई किर्लोस्कर यांना यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com