BULLET TRAIN : आता ड्रोन यंत्रणेने बांधकामाचे रेग्यूलर मॉनिटरींग

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचे रेग्यूलर मॉनिटरींग अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे होणार आहे. देशातील आघाडीच्या ‘आयजी ड्रोन’ कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी नुकतेच देशाच्या पहिल्या 5G तंत्राच्या आयजी ड्रोन स्कायहॉकचे उद्घाटन केले आहे.

Bullet Train
सर्वच विकासकामांचे ऑडिट; अधिकारी, ठेकेदारांच्या खाबुगिरीला चाप

आयजी ड्रोन कंपनी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रगतीचे रेग्यूलर मॉनिटरींग आपल्या अत्याधुनिक ड्रोन यंत्रणेद्वारे करणार आहे. या कामासाठी अंत्यत सोफिस्टीकेटेड सेंसर असलेल्या अत्याधुनिक ड्रोनचा कंपनी वापर करणार आहे. या कामाासाठी कंपनीने अत्याधुनिक ड्रोन विकसित केले असून त्याच्या आधुनिक सेंसरद्वारे जास्तीतजास्त तंतोतंत आणि अचूक डाटा जमा करणार आहे.

Bullet Train
Bullet Train : बुलेट ट्रेनच्या महाराष्ट्रातील स्टेशन्सला युनिक लूक

या ड्रोनद्वारे कन्स्ट्रक्शन साईटवरील हाय रिझोल्यूशन ईमेज आणि व्हिडीओ चित्रित केले जाणार आहेत. एका सॉफ्टवेअरद्वारे या ईमेज आणि व्हिडीओ आदी डाटाला एकत्र करून या प्रकल्पाच्या प्रगतीचा सखोल तांत्रिक आणि विश्षेलणात्मक आढावा घेता येणे शक्य होणार आहे. हा प्रगतीचा अहवाल पाहून सरकारी अधिकारी आणि वैधानिक यंत्रणांना निर्णय घेता येणे शक्य होणार आहे.

Bullet Train
Mumbai: मुंबईकरांसाठी काही पण...असे का म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्याचे महत्वाचे काम आयजी ड्रोन कंपनीला मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे आम्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा एक भाग होणार असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे असे आयजी ड्रोनचे सीईओ आणि संस्थापक बोधिसत्व संघप्रिय यांनी म्हटले आहे.

Bullet Train
Mumbai-Goa Highway: 'तो' बोगदा 2 महिन्यात खुला होणार

मुंबई ते अहमदाबाद या 508 किमीच्या मार्गावर दर ताशी 350 किमी वेगाने बुलेट चालविण्याची योजना असून साबरमती ते बीकेसी हे अंतर दोन तासात कापले जाणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके असून 8 स्थानके गुजरातमध्ये तर 4 स्थानके महाराष्ट्रात आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सुरत ते बिलीमोरा हा पहिला टप्पा 2026 पर्यंत सुरू करण्याची योजना आहे. हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि केंद्र सरकार तसेच संबंधित दोन राज्यांच्या एकत्रित सहभागाने जपानच्या सहकार्याने बांधला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 1 लाख कोटी रूपये इतका आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com