ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मुलींसाठी 'याठिकाणी' उभं राहतंय वसतिगृह

Thane
ThaneTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्‍यांसाठी लवकरच भाईंदरपाडा येथे सर्व सोईंनी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. भाईंदरपाडा येथे सुमारे २,२०० चौ.मी.चा भूखंड त्यासाठी उपलब्ध झाला आहे. या वसतिगृहासाठी १५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Thane
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता इंटरमिजिएट रिंगरोड

ठाणे महापालिकेने भाईंदरपाडा येथील सुमारे २,२०० चौ.मी.चा सुविधा भूखंड रेडीरेकनरच्या दराने घेऊन आदिवासी विभागाकडे सुपूर्द केला आहे. जागेचा प्रश्न निकालात काढत महापालिकेने बांधकामाची टेंडर प्रक्रियादेखील पूर्ण केली आहे. त्यामुळे येत्या महिन्‍याभरात या वसतिगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.

Thane
वांद्रे टर्मिनस ते खार रोडला जोडणारा 'तो' पूल खुला!

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आदिवासी पाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या परिसरात वास्तव्यास आहेत; परंतु त्यांना अद्यापपर्यंत आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. मतदारसंघातील आदिवासी विद्याथ्यांकरिता वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यासाठी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह व्हावे, याकरिता आमदार प्रताप सरनाईक सरकारकडे वारंवार पाठपुरावा करीत होते.

Thane
मुंबई 'मेट्रो-3'च्या भुयारीकरणाची 98 टक्के मोहीम फत्ते

राज्य सरकारने १५० क्षमता असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाकरिता सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये मान्यता देऊनही जागेची आवश्यकता असल्याने या कामाला गती मिळत नव्हती. त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीने भाईंदरपाडा येथील सुमारे २२०० चौ.मी.चा सुविधा भूखंड ठाणे महानगरपालिकेने रेडीरेकनरच्या दराने घेऊन आदिवासी विभागाकडे सुपूर्द केला होता. हा जागेचा प्रश्न निकाली काढला असून, वसतिगृहाच्या बांधकामाची टेंडर प्रक्रियादेखील पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामास पुढील महिन्यात लवकरच सुरुवात होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Thane
औरंगाबादकरांना मोठा दिलासा; आता आषाढी एकदशीपासून पाणी...

भाईंदरपाडा येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधण्याकरिता शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी सन २०१७-१८ च्या दरसूचीनुसार १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या वसतिगृहाची इमारत तळ+सहा मजल्याची असून इमारतीचे क्षेत्रफळ ४४८२.७५ चौ.मी. आहे. या इमारतीच्या तळमजल्याला स्वयंपाकगृह, भोजन कक्ष व भांडारगृह बांधण्यात येणार असून पहिला मजला ते सहाव्या मजल्यापर्यंत मुलींना राहण्याकरिता खोल्या, प्रसाधनगृह, सभागृह व अधीक्षिका निवासस्थान असणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com