हँडवॉश खरेदीतून ग्रामपंचायतीची हातसफाई; आठ हजाराचे स्टॅण्ड...

Wardha

Wardha

Tendernama

Published on

वर्धा (Wardha) : कोरोना काळात शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक साहित्याची खरेदी करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाला दिली. यात जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींना हॅण्ड वॉश स्टॅण्ड पुरविण्याचा निर्णय घेतला. यात झालेल्या खरेदीत चांगलाच घोळ झाल्याचे संकेत माहिती अधिकारात हाती आलेल्या कागदपत्रातून मिळत आहे.

Wardha

EXCLUSIVE:मंत्री पाडवींच्या आशीर्वादाने ठेकेदाराचे ४५ कोटींचे पोषण

बाजारात साधारण सात ते आठ हजार रुपयांत मिळत असलेले सॅनिटायझर स्टॅण्ड जिल्हा परिषदेच्यावतीने ४० ते ५० हजार रुपयांत खरेदी केल्याचे माहिती अधिकारात हाती आलेल्या देयकांवरून उघड होत आहे. यामुळे या खरेदीत जिल्ह्यात चांगलात घोळ झाल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीत हे स्टॅण्ड पुरविण्यात आल्याने हा घोळ कोटींच्या घरात असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Wardha

अधिवेशनात 'बांधकाम'च्या अधिकाऱ्यांची दिवाळी; 4 कोटींची उधळपट्टी

ही खरेदी १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचयात आहेत. या खरेदीसंदर्भात जिल्हा परिषदेचे सदस्य मनीष फुसाटे यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागिली. यात काही ग्रामपंचायतीच्या वतीने ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी जिल्हा परीषद सभागृहात हा मुद्या मांडून हा घोळ उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात जिल्हा परिषदेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याने कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Wardha

मंजुरी नसताना राबविली टेंडर प्रक्रिया; महापालिकेवर 19 कोंटीचा भार

सीईओंनी दिलेल्या खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघण
हॅण्ड वॉश स्टेशन खरेदी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ हजारांची मर्यादा दिली असताना सर्व ग्रामपंचायतीने हे वॉश स्टेशन ४० हजार रुपयांत खरेदी केले. काही ग्रामपंचयातींनी त्याही पेक्षा जास्त रुपयांत खरेदी केली. सर्व ग्रामपंचायतीत हॅण्ड वॉश स्टेशन विक्री करणारा एकच ठेकेदार असून यात मोठ्या घोटाळ्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये तीन ते चार वॉश स्टेशन खरेदी करण्यात आले आहे.

Wardha

टेंडर प्रक्रिया टाळून 93 लाखांची खरेदी;पुरवठा एकाचा बिले दुसऱ्याची

एका वॉश स्टेशनला आठ हजारांचा खर्च
वॉश स्टेशन खरेदीत जनतेच्या पैशाची लूट केल्या गेली आहे. संपूर्ण जिल्ह्यात साधारण साडेतीन ते चार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार ग्रामपंचायतींच्या विकास निधीतून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एक वॉस स्टेशन बनवण्यासाठी साधारणपणे आठ हजार रुपये खर्च येतो, असे कारागीर सांगत आहे. मग जिल्हा परिषदेच्या एका स्टॅण्डला ४० ते ५० हजारांचा खर्च कसा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Wardha

निवडणूक येताच सत्ताधारी-विरोधकांत दिलजमाई; रस्त्यांसाठी 'टेंडर'

कोरोना कोळात मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी करण्यात आली. यात हॅण्ड वॉश स्टेशन खरेदी करताना जिल्हा परिषदेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोळ झाल्याचे माहिती आधिकारात उघड होत आहे. याच्या चौकशीची मागणी केली पण, जिल्हा परिषदेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- मनीष फुसाटे, जिल्हा परिषद सदस्य

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com