सरकारच्या 'या' निर्णयाने डोकेदुखी वाढली; बांधकाम परवानगी झाली अवघड

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : स्थानिक स्वराज्य संस्था अथवा अन्य प्राधिकरणाकडून ले आउट मंजूर करून न घेता चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी बेकायदा तुकडे पाडून जमिनीची विक्री केली आहे. अशा जमिनीवर (सर्व्हे नंबर) आता बांधकामास परवानगी देताना ११ जानेवारी १९६७ मध्ये जमिनीचे (सातबारा उताऱ्यावरील) क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर आजच्या नियमानुसार क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राच्या पाच टक्के सुविधा क्षेत्रासाठी (ॲमेनिटी स्पेससाठी) जागा राखीव ठेऊन मगच परवानगी दिली जाणार आहे. असा निर्णय राज्य सरकारने नव्याने केला आहे. त्यामुळे बावधन, बाणेर, बालेवाडीसह उपनगरांमधील जागा मालकांना येथून पुढे बांधकामांना परवानगी घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

Pune
पुणे एअरपोर्ट ते सेनापती बापट रस्ता होणार चकाचक! कारण...

समजा एखाद्या सर्व्हेनंबरचे क्षेत्र ११ जानेवारी १९६७ मध्ये सहा एकर होते. दरम्यानच्या काळात जमिनीची जरी तुकडे पाडून त्यांची विक्री झाली. तुकडे पाडताना स्थानिक स्वराज्य संस्था अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी घेतलेली नाही. अशा सर्व्हेनंबरमधील (शिल्लक) दहा गुंठे जागा जर तुम्ही विकत घेतले आहे. आज तुम्हाला त्या जागेवर बांधकाम करावयाचे असेल, तुम्ही बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला. तर नवीन नियमानुसार पाच एकरच्या आतील ती जमिनी असल्यामुळे परवानगी देताना ११ जानेवारी १९६७ मध्ये त्या सर्व्हेनंबरचे (सातबारा उताऱ्यावरील) एकूण क्षेत्र किती होते, त्या सर्व्हेनंबरवर यापूर्वी लेआउट मंजूर करून तुकडे पाडून तिची विक्री झाली आहे का, तसे असेल तर अडचण येणार नाही. मात्र नसेल तर मग १९६७ मधील जमिनींचे क्षेत्र सहा एकर असेल, आणि त्यानंतर तुकडे पाडून त्याची विक्री झाली असेल, तरीही जुन्या क्षेत्राचा विचारात घेऊन त्यापैकी नव्या नियमानुसारचे (युडीसीपीआर) पाच एकर क्षेत्र वगळून उर्वरित एक एकर क्षेत्र शिल्लक राहते, असे गृहीत धरून त्यावर पाच टक्के सुविधा क्षेत्रासाठी जागा राखीव ठेवण्याचा नियम तुम्हाला लावला जाणार.

Pune
नाशिक झेडपीच्या सीईओंचा दणका; जलजीवनच्या टेंडरची फेरतपासणी

असे आहे गणित...
- सहापैकी पाच एकर जागा सोडून उर्वरित एक एकर जागेच्या पाच टक्के म्हणजे दोन गुंठे जागा सुविधा क्षेत्रासाठी राखीव ठेवणे बंधनकारक
- असा विचार करून तुमच्या दहा गुंठ्यामध्ये दोन गुंठे जागा (सुविधा क्षेत्रासाठी राखीव) सोडून बांधकाम परवानगी मिळणार
- म्हणजे प्रत्यक्षात आठ गुंठ्यांवरच तुम्हाला बांधकामाला परवानगी मिळू शकणार

Pune
नाशिक : इ-चार्जिंग स्टेशन्स जागांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी

नव्या तरतुदीनुसार बांधकाम परवानगी देताना ५५ वर्षांपूर्वीची जमिनींची स्थिती विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे गेल्या ५५ वर्षांत शहरात जमिनींची मोठ्या प्रमाणावर तुकडे पाडून विक्री झाली आहे. अनेक ठिकाणी सोईनुसार बेकायदेशीररीत्या तुकडे पाडून त्यांची विक्री करण्यात आली आहे. एक-दोन गुंठ्यांपासून ते ११ गुंठ्यापर्यंतचे तुकडे पाडण्यात आले. त्यावर बांधकामेही ही झाले आहेत. परंतु काही नागरिकांनी अद्यापही बांधकाम केले नाही आणि आता त्यांना बांधकाम करावयाचे असेल, तर त्यांना या नियमाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छोटे प्लॉट असेल, तर ते बांधकाम योग्य राहणार नसल्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Pune
खुश खबर! 'या' करारामुळे नाशिककर 2041 पर्यंत झाले निर्धास्त

पुनर्विकासासाठी आलेल्या इमारतींना देखील हा नियम लागू झाल्यामुळे त्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांप्रमाणेच महापालिकेच्या उत्पन्नाला देखील या नियमाचा फटका बसणार आहे. यातून अनधिकृत बांधकामांना अधिक चालना मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com