मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरपालिका (BMC) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या मलबार येथील सागर बंगल्यासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी 22 कोटी खर्च करणार आहे. हा रस्ता पुढील सहा महिन्यांत पूर्ण केला जाणार आहे.
मलबार हिल येथे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ठिकाणी नारायण दाभोलकर मार्ग आणि जे मेहता मार्ग या रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका 22.27 कोटी रुपये खर्च करणार आहे. 6 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. हा रस्ता व्हीआयपी रोड (Nepean sea Road) आहे. नारायण दाभोलकर रस्ता 880 मीटर आणि जे मेहता रोड 200 मीटर आहे. हा रस्ता नेपियन सी रोड आणि नारायण दाभोलकर रस्त्याला जोडणारा आहे. संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.
फूटपाथवर युटिलिटीच्या केबलसाठी डक्ट बांधले जाणार आहेत. युटिलिटिजसाठी 1 मीटरचा डक्ट ठेवला जाणार आहे जेणेकरुन वारंवार रस्त्याचे खोदकाम होवू नये. तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनच्या आवश्यकतेनुसार ड्रेनेज लाइन टाकल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेने 400 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 5800 कोटी रुपयांची टेंडर प्रसिद्ध केले होते. टेंडरला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही टेंडर रद्द करण्यात आली आहेत. यामुळे महापालिकेचे रस्त्यांचे कामे रखडणार आहे. त्यामुळे आता नव्याने टेंडर प्रक्रिया राबवताना रस्ते बांधणीचा खर्च वाढून ७ हजार कोटींवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महापालिका लवकरच रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी नव्याने टेंडर काढणार आहे.