एकच सदनिका परस्पर विक्री प्रकरणी तक्रारीचे स्वरूप पाहून SIT:फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : कांदिवली मुंबई येथील राज शिवगंगा इमारतीतील सदनिका विक्री गैरव्यवहार प्रमाणेच मुंबईमध्ये इतरत्र असेच प्रकार घडले असतील तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल कराव्यात. या प्रकरणाची व्याप्ती आणि आलेल्या तक्रारींचे स्वरूप लक्षात घेऊन आवश्यकता वाटल्यास विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत दिली.

Devendra Fadnavis
तानाजी सावंतांची औरंगाबादकरांना गुड न्यूज; 'ती' मागणी अखेर पूर्ण

विधानसभेत आमदार सदस्य किसन कथोरे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. ते म्हणाले की, कांदिवली येथील राज शिवगंगा इमारतीतील एकाच सदनिकांची परस्पर दोनपेक्षा अधिक जणांना विक्री करून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis
'या' तंत्रज्ञानातून मुंबई महापालिका भर पावसातही बुजविणार खड्डे

यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी रूपारेल डेव्हलपर्सकडून झालेल्या ग्राहकांच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित करत या विकासाला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.  विधानसभा सदस्य योगेश सागर, संजय केळकर यांनीही मुंबईत इतर ठिकाणीही असे प्रकार घडल्याचे या चर्चेदरम्यान सांगितले. त्यावर, फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येईल. याप्रकरणी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचे स्वरूप बघून आवश्यकता वाटल्यास विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com