रिफायनरीबाबत फडणवीस म्हणतात शक्य नाही तर मुनगंटीवार सातत्याने...

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis, Sudhir MungantiwarTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नाणार येथे प्रस्ताविक पेट्रोकेमिकल रिफानरीचे तीन तुकडे करून एक भाग विदर्भात सुरू करण्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी दिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सागरी किनारा नसल्याने ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) ही रिफायनरी चंद्रपूरला यावी करिता सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विदर्भातील उद्योजक चांगलेच कन्फ्युज झाले आहेत.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
पंतजलीचा टाळाटाळ ‘योग‘, प्रकल्प होईना सुरू, अडचण काय?

नाणार येथे रिफायनरी सुरू करण्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काडाडून विरोध आहे. भाजपसोबत युतीत असतानाही त्यांचा विरोध होता. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षआंचा कार्यकाळात त्यांनी प्रकल्पाला एकही पाऊन पुढचे टाकू दिले नाही. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी जोर धरू लागली होती. अनेकांनी तशी मागणीही केली होती. ‘विदर्भ एकॉनॉमी डेव्हलपमेंट कौंसिल' (वेद) या विदर्भातील उद्योजकांच्या संघटनांनी यावर अभ्यास केला. त्याचा डीपीआर तयार केला. तो केंद्रीय मंत्र्यांकडे सादर केला. मध्यंतरी चंद्रपूरला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आले असता त्यांनी तीन तुकडे करून रिफायनरी स्थापन केली जाईल, त्यातील एक भाग विदर्भात सुरू केला जाईल असे सुतोवाच केले होते. तत्पूर्वी विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स सुरू करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
नागपूर-हैदराबाद होणार शेजारी; आठ तासाचे अंतर होणार साडेतीन तासांचे

रिफायनरी संदर्भात बोलताना फडणवीस यांनी विदर्भात समुद्र किनारा नसल्याने ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले. असे असेल तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि वेद कशासासाठी आग्रह धरत आहे असा सवाल उपस्थित होते. या प्रकल्पाने विदर्भाची इकॉनॉमी बदलू शकते. येथील नेत्यांच्या आपसातील मतभेदात कोकणाप्रमाणे विदर्भातही हा प्रकल्प होण्याची सध्यातरी कुठलीच शक्यता दिसत नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com