दुबईच्या धर्तीवर मुंबई फिल्मसिटीचा विकास; 'रिलायन्स'ला का नाकारले?

२६०० कोटींसाठी रिटेंडर
Mumbai

Mumbai

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : बॉलिवूड (Bollywood) म्हणजेच मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीला (मुंबई फिल्म सिटी) (Mumbai Film City) देशातच नव्हे तर जगभरात मान्यता आहे. मात्र, असे असले तरी मुंबईतील चित्रनगरीमध्ये चित्रीकरणाच्या सुविधांची वाणवा जाणवते. त्यामुळे आता दुबई आणि हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या फिल्मसिटीचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई चित्रनगरी जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी २६०० कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच रिटेंडर मागविण्यात येणार आहे.

Mumbai

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे काम वेगाने; 'इतका' खर्च

देशभरात सिने उद्योगात बॉलिवूड आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ टॉलीवूडचा क्रमांक लागतो. मात्र, असे असले तरी चित्रपट निर्माण क्षेत्रात आणि चित्रीकरणाच्या सुविधांमध्ये बॉलिवूड पिछाडीवर पडले आहे. मुंबईमध्ये असलेल्या चित्रनगरीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावर राहिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मुंबई चित्रनगरीचा पुनर्विकास अद्ययावत असलेल्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि दुबईच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai

मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन; अहवाल अंतिम टप्प्यात

मुंबईतील भव्य अशा चित्रनगरीच्या विकासासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास मंडळाने हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि दुबई येथील एका चित्रपट स्टुडिओचा पाहणी दौरा अभ्यास केला. आरएफसी (रामोजी फिल्म सिटी) आणि दुबईतील स्टुडिओसह अन्य काही स्टुडिओचीही पाहणी केल्याची माहिती मुंबई चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांनी दिली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी चित्रीकरणासह पोस्ट प्रोडक्शनमधील सुविधा खूप चांगल्या आहेत. त्याचप्रमाणे दुबई फिल्मसिटीमध्येही चित्रपटापूर्वीच्या प्रोडक्शनच्या सुविधा चांगल्या असल्याचे पगारे यांनी सांगितले. या दोन महत्त्वाच्या स्टुडिओशिवाय रामा रायडू, अन्नपूर्णा आणि ए बी प्रसाद या स्टुडिओनांही भेट देऊन पाहणी केल्याचे पगारे यांनी सांगितले.

Mumbai

मुंबई-पुणे आणखी सुपरफास्ट; चिरले ते खालापूर रस्त्यासाठी सल्लागार

दुबईमध्ये चित्रपटांचा उद्योग नाही. मात्र, भारतीय चित्रपटांचे दुबईतल्या स्टुडिओत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होत असते. विक्रम वेधा या तामिळ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण दुबईतील स्टुडिओत झाले आहे. त्यामुळे मुंबई चित्रनगरीच्या पुनर्विकासासाठी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी आणि दुबईच्या स्टुडिओ व्यवस्थापनाला आमंत्रण दिल्याची माहितीही पगारे यांनी दिली.

Mumbai

मुंबई पालिकेचा अजब कारभार; ठेकेदार नियुक्तीनंतर नेमला सल्लागार

मुंबई चित्रनगरीच्या विकासासाठी २०१९ मध्ये जागतिक टेंडर काढण्यात आले होते. मात्र, या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई चित्रनगरी हा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी २६०० कोटी रुपयांची योजना असल्याची माहिती पगारे यांनी दिली. मार्च २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या टेंडरला रिलायन्स इंडस्ट्रीने प्रतिसाद दिला होता. मात्र रिलायन्सला ९० वर्षांच्या भाडेकरारावर चित्रनगरीचा ताबा हवा होता. तर राज्य सरकारने ९० वर्षां ऐवजी ६० वर्षांचा भाडे करार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया फिस्कटली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Mumbai

EXCLUSIVE : मुंबई म्हाडा सभापतीपदावरुन राष्ट्रवादीत घमासान

मुंबईतील गोरेगाव येथील ५२१ एकर क्षेत्रावर असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये सध्या ११ स्टुडिओ आहेत. या ठिकाणी अद्ययावत २० स्टुडिओ तयार करण्याची योजना आहे. चित्रनगरी पुनर्विकास योजनेअंतर्गत याठिकाणी एक संग्रहालयसुद्धा तयार करण्याची राज्य सरकारची योजना आहे. या संग्रहालयात बॉलिवूडसह मराठी चित्रपटांसंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच या चित्रनगरीत एक चार तारांकित हॉटेल आणि एक सर्वसामान्यांसाठी हॉटेल तयार करण्याचीसुद्धा योजना आहे. याशिवाय पुनर्विकसित चित्रनगरीत स्पेशल इफेक्ट स्टुडिओ ॲनिमेशन सेंटर आणि ॲम्युजमेंट पार्क सुद्धा तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती पगारे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com