औरंगाबादेत ठेकेदारांची चलाखी; दुभाजकात मातीऐवजी भरले...

Aurangabad

Aurangabad

Tendernama

Published on

औरंगाबाद (Aurangabad) : एमएसआरडीसीच्या (राज्य रस्ते विकास महामंडळ) (MSRDC) वाट्यातील ५४ कोटींच्या रस्त्यातील आरसीसी रस्ता दुभाजकात चक्क डेब्रिज (जुनाट दगड, विटा व गट्टू व बिल्डींग मटेरियल ) टाकले जात असल्याची कैफियत औरंगाबादकरांनी मांडल्यानंतर 'टेंडरनामा'च्या प्रतिनिधीने वरद गणेश मंदिर ते सिल्लेखाना मार्गावरील रस्ता दूभाजकाची पाहणी केली आणि यामध्ये तथ्य आढळून आले. यासंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांना ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने एमएसआरडीसीला नोटीस बजावली आहे. दुसरीकडे ठेकेदाराला सांगून तातडीने डेब्रिज काढून माती टाकण्याचे सांगतो, असे म्हणत अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची पाठराखण केली.

Aurangabad

EXCLUSIVE:मंत्री पाडवींच्या आशीर्वादाने ठेकेदाराचे ४५ कोटींचे पोषण

राज्य सरकारने औरंगाबादमधील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. २० रस्त्यांपैकी सात रस्त्यांची कामे ५४ कोटी ५९ लाखांत एमएसआरडीसीकडून केली जात आहेत. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते सलीम अली सरोवर रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (१२०० मीटर लांबी, १०.९८ कोटी खर्च), वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी रस्त्याचे डांबरीकरण करणे (२,१५० मीटर लांबी, १२.५५ कोटी खर्च), जाफरगेट ते मोंढा नाका आणि जाफर गेट ते आठवडी बाजार रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (लांबी ९५० मीटर, ९.४३ कोटी खर्च), पोलिस मेस ते गटगटगेट रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे (९५० मीटर लांबी, ७.७५ कोटी खर्च), नौबत दरवाजा ते सिटीचौक पुलासह रस्त्याचे काँक्रिटीकरण (५३५ मीटर लांबी, ५.७५ कोटी खर्च), मदनी चौक ते सेंट्रल नाका रस्त्याचे डांबरीकरण करणे (७५० मीटर लांबी, ४.२५ कोटी खर्च), गोपाल टी हाऊस ते उत्सव मंगल कार्यालय रस्त्याचे काँक्रिटीकरण व औषधीभवन येथील नाल्याचे काम करणे (३३० मीटर लांबी, २.५३ कोटी) आदी रस्त्यांचा समावेश आहे.

Aurangabad

आदिवासींच्या योजनेवर २३३ कोटींचा दरोडा?; टेंडरशिवाय कंत्राटाचा घाट

उद्देशालाच फासला हरताळ

रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार व्हावेत यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसीला रस्ते विभागून देण्यात आले आहेत. त्यानुसार एमएसआरडीसीच्या टेंडरमध्ये यशस्वी ठरलेल्या मापारी कन्सट्रक्शन, हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर, लक्ष्मी कन्सट्रक्शन व चारनीया कन्सट्रक्शन यांना या रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत.

या ठेकेदारांची चलाखी

वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी रस्त्याचे डांबरीकरण मापारी कन्सट्रक्शन यांना देण्यात आले आहे. २.१५० मीटर लांबी असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी तब्बल साडेबारा कोटी रूपये खर्च केले जात आहेत. या मार्गावरील सिल्लेखाना ते सावरकर चौकारदम्यान रस्त्याचे डांबरीकरण झाल्यावर आरसीसी दुभाजक उभारण्यात आला. पण त्यात चक्क डेब्रिजचा भराव टाकून भरती केली जात असल्याचे उघड झाले आहे.

Aurangabad

मुंबईत रस्त्यांवर 'होऊ दे खर्च'; पुन्हा साडेचारशे कोटींचा प्रस्ताव

वृक्ष लागवड होणार कशी

भविष्यात या रस्ता दुभाजकात वृक्ष लावली जातील खरी परंतु रस्त्याचे काम करताना दुभाजकात डेब्रिज टाकल्याने त्या वृक्षाची वाढ खुंटेल, असा मुद्दा शहरातील पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कितीही एमएसआरडीसी आणि भविष्यात रस्ते महापालिकाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर त्या रोपट्याना कितीही पाणी घातले तरी वाढ होऊच शकणार नसल्याचे म्हणत वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

गुळगुळीत रस्त्यांवर ऑक्सिजन हब हवाच

रस्त्यांवर वाढत्या वाहतुकीचे प्रमाण पाहता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष जगविणे ही काळाची गरज आहे. जर वृक्ष जगली तर नैसर्गिक संतुलन राहते. त्यामुळे सरकारने दीडशे कोटीतील आरसीसी आणि डांबरी रस्त्यांसाठी भरघोस निधी देताना यावेळी रस्त्यांची यादी न वाढवता कमीत कमी पण दर्जेदार रस्ते करा. यासाठी रस्त्यांच्या कडेला फुटपाथ, पावसाळी भुमिगत गटार आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजक आणि त्यात विविध झाडाफुलांचे सुशोभिकरण करा. या अटींवरच निधी वितरीत केला आहे. परंतु मापारीने दुभाजकात डेब्रिज टाकत सरकारच्या आदेशावरच धूळफेक केली आहे.

Aurangabad

अधिवेशनात 'बांधकाम'च्या अधिकाऱ्यांची दिवाळी; 4 कोटींची उधळपट्टी

अशी लढवतात ठेकेदार युक्ती

औरंगाबाद महापालिका हद्द आणि परिसरातील बहुतांशी नवीन रस्त्याची काम सुरू आहेत. यात काही महामार्गांचा देखील समावेश आहे. मात्र रस्त्यांचा विकास करताना ठेकेदार चलाखी करून व वाहतुकीचे खर्च वाचवून रस्तानिर्मिती व विकास करताना निघालेला सिमेंट, दगड, डांबर याच दुभाजकात टाकतात.प्रत्यक्षात दुभाजकात खालच्या थरात लाल व वरच्या थरात काळी माती टाकणे बंधनकारक आहे.

कुठे आहेत अभियंते आणि प्रकल्प सल्लागार

विशेष म्हणजे रस्त्याच्या काम चालू असताना त्यावर देखरेख करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून यश कन्सल्टन्सीचे समीर जोशी आणि टीमची पीएमसी (प्रकल्प सल्लागार समिती ) निवड केली आहे. त्याच बरोबर कामावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी एमएसआरडीसीचे उपअभियंता अशोक इंगळे, अधिक्षक अभियंता सुरेश अभंग, मुख्य अभियंता बी. बी. साळुंखे यांची नियुक्ती केलेली असते. परंतु एव्हढी मोठी फळी असताना ठेकेदार आपले थोडेसे पैसे वाचविण्यासाठी एवढी हिम्मत करतोच कशी? असा सवाल औरंगाबादकर विचारत आहेत.

कोण काय म्हणाले

याबाबत शहर अभियंता सखाराम पानझडे यांना ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने एमएसआरडीसीला नोटीस बजावल्याचे सांगितले. दुसरीकडे एमएसआरडीसीचे अधिक्षक अभियंता सुरेश अभंग यांना थेट सवाल करताच ठेकेदाराला डेब्रिज काढून माती टाकण्याचे सांगतो असे म्हणत त्यांनी ठेकेदाराची बाजु सावरण्याचा प्रयत्न केला. चलाखीवर काय कारवाई करणार या प्रश्नाचे उत्तर देताना टेंडरमध्ये तो ॲटमच नसल्याचे ते सांगतात. जर तो ॲटम नाहीच मग डेब्रिजची चलाखी कशासाठी यावर मात्र अभंग यांनी मौन पाळले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com