मुंबई पालिकेने काढले १६ कोटींचे टेंडर ठेकेदार म्हणतो अर्धेच बस्स!

Powai Lake
Powai LakeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णीसह तरंगणाऱ्या वनस्पती आणि कचरा साफ करण्यासाठी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदाराची (Contractor) नियुक्ती करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महानगर पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा 46.08 टक्के कमी दराने हे काम करण्याची तयारी संबंधित ठेकेदाराने केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावरच भले मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असून प्रशासनातील बाबू महापालिका आणि नागरिकांच्या हितापेक्षा ठेकेदारांचे हितसंबंध जपण्यासाठीच तर अंदाजपत्रक फुगवत नसावेत ना अशी जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

Powai Lake
'कोळसा धुवा अन् कोट्यवधी कमवा'; १२०० कोटींच्या टेंडरवर प्रश्न?

पवई तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, तलावात येणाऱ्या सांडपाणी आणि मैलापाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवलेली असते. यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा तर पाेहचतेच त्याबरोबर तलावातील जैवविविधतेला धोका असतो. त्यामुळे ही जलपर्णी तसेच तलावात उगवणारी इतर झाडे, कचरा साफ करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने टेंडर मागविले होत्या. यात पालिकेने 16 कोटी 45 लाख रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. मात्र, सर्वात कमी दराने टेंडर भरणाऱ्या कंत्राटदाराने तब्बल 46.08 टक्के दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. तब्बल आठ कोटी 87 लाख खर्च महापालिकेला येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.

Powai Lake
पुणे–सातारा रस्त्यावर रिलायन्सकडून २ हजार कोटींची बेकायदा टोलवसुली

अंदाजित दरापेक्षा जवळ जवळ निम्मा खर्च असल्याने प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला दर विश्‍लेषण करण्यास सांगितले होते. हे दर विश्‍लेषण समाधानकारक असल्याचा दावा प्रशासनाने या प्रस्तावात केला आहे. या कंपनीकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून पाच कोटी 60 लाख रुपये जमा करुन ठेवण्यात येणार आहे. ही 50 वर्ष जुनी कंपनी असून स्वत:च्या मालकीच्या मशिन्स, यंत्रणा आहे. तसेच, मनुष्यबळही आहे, असा दावाही प्रशासनाने केला आहे.

Powai Lake
'या' कारणामुळे रखडले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

टेंडर मागवताना महानगर पालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्राच्या 15 ते 20 टक्के कमी अथवा जास्त दराने टेंडर प्राप्त होणे ही नियमित बाब आहे. मात्र, जवळ जवळ अर्ध्या किंमतीत टेंडर प्राप्त होणे हा दुर्मिळ प्रकार आहे. या टेंडर प्रक्रियेत सहा कंत्राटदार सहभागी झाले होते. त्यात कंत्राटदारांनी 25 टक्क्यांपर्यंत कमी दराने टेंडर भरल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावरच प्रश्‍न निर्माण होत आहे.

Powai Lake
औरंगाबादमध्ये १२० कोटींचे टेंडर फुगणार; …पैसाही जाणार

जलपर्णीचा धोका -
- डेंगी मलेरियाच्या डासांची पैदास होऊन परिसरातील नागरिकांना धाेका
- तलावातील जैवविधितेवर परिणाम
- सूर्यप्रकाशाचे परावर्तन कमी होत असल्याने माश्‍यांचे खाद्य असलेल्या वनस्पतीच्या वाढीत अडथळे येऊन अन्नसाखळीवर परिणाम.
- पाण्यातील प्राणवायूवर परिणाम
- पाण्यातील आवश्‍यक वनस्पतींची वाढ कमी होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com