समृद्धी महामार्गावर काँग्रेस नेत्याची 'ही' स्टंटबाजी कशासाठी?

Ashish Deshmukh
Ashish DeshmukhTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : प्रसिद्धीची एकही संधी न सोडणारे भाजपचे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव आशिष देशमुख यांनी गुरुवारी सकाळी उद्‍घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर फेरफटका मारून स्टंंटबाजी केली. देशमुखांनी बीएमडब्ल्यू गाडी स्वतः चालवत सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास या मार्गावरून केला. या दरम्यान त्यांनी समृद्धी महामार्गाने विदर्भात औद्योगिक समृद्धी आणावी, असे आवाहनसुद्धा सरकारला केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, देशमुख यांची ही स्टंटबाजी नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वेळी त्यांच्या गाडीचा वेग जवळपास २०० किमी प्रतितास होता.

देशमुखांना सतत चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते. आमदार असताना ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेकदा सायकलने यायचे. फोटोसेशन झाल्यानंतर आलिशान गाडीतून परत जायचे. स्वपक्षीय नेत्यांवरही टीका करण्यास त्यांनी कधी मागे पुढे बघतले नाही. त्यामुळे होणारे राजकीय फायदे, तोटेही याचाही विचार करीत नाहीत.

Ashish Deshmukh
उच्च न्यायालयाचा दणका; आलापल्ली-सिरोंचा महामार्गाच्या कामाची...

भाजपमध्ये असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशमुख यांनी तोफ डागली होती. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा फडणवीस यांना विसर पडल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भाजपसोबत टोकाचे संबंध बिघडले होते. दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ते देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधात लढले. पराभव झाल्यानंतरही ते शांत बसले नाही.

Ashish Deshmukh
सायलेंट किलर 'वागशीर'चे जलावतरण; वर्षभरानंतर नौदलात...

प्रदेशाध्यक्ष असताना बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत ते राज्यात फिरले नाहीत, फक्त आपल्याच मतदारसंघात मश्गुल होते, असा आरोप देशमुख यांनी केला होता. कोकण रिफायनरी नागपूरमध्ये आणावी याकरिता ते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. विदर्भात समुद्र नाही असे त्यांना समजावून सांगितल्या नंतरही हा प्रकल्प विदर्भात कसा 'व्हायेबल' आहे, असे ते पटवून देत आहेत. समृद्धी महामार्गाचे नागपूर ते वाशिम (सेलूबाजार) या दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन दोन मे रोजी होऊ घातले आहे. ही संधी साधून देशमुखांनी आधीच स्टंंटबाजी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com