CNG कारचालकांना दिलासा; 'समृद्धी'वर सीएनजी लाईनचे काम युद्धपातळीवर

CNG
CNGTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) काम सध्या गतीने सुरु आहे. महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे दळणवळणाची गती वाढणार आहे. याच महामार्गालगत सीएनजी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सीएनजी पाईपलाईनचे काम 60 टक्के पूर्ण झाल्याची माहिती 'गेल' अर्थात गॅस अथॉरिटी ऑफ इंडियातील उच्चपदस्थांनी दिली.

CNG
शेतजमीन मालकांना दिलासा; तुकडेबंदीबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय

समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यांतून किंवा जिल्ह्यांच्या आजूबाजूने गेला आहे, त्या जिल्ह्यात आगामी काळात सीएनजी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील मोजके जिल्हे वगळता अनेक ठिकाणी सीएनजी अद्याप पोहोचला नाही. मात्र आता समृद्धी महामार्गाच्या कडेने जाणाऱ्या पाईपलाईनद्वारे सीएनजी मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला सक्षम पर्याय उपलब्ध असेल. तसेच गॅसवाहिनीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दर 20 मीटर अंतरावर वॉल्व्हदेखील टाकण्यात येणार आहेत.

CNG
'समृद्धी महामार्गा'वर दर २५ किलोमीटरला सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन

महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांतून गेलेला आहे. यापैकी औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नाशिक व अहमदनगर वगळता कुठेही सीएनजीची योजना सुरु झालेली नाही. नागपूरसारख्या ठिकाणी सीएनजी मुंबई, पुण्यातून टँकरद्वारे वाहतूक करून पोहोचवला जातो. त्यामुळे अल्प प्रमाणात आहे, तसेच मुंबई पुण्याच्या तुलनेत दीडपट महाग आहे. गॅस पाईपलाईनद्वारे पुरवलेला सीएनजी पुरेशा प्रमाणात स्वस्त राहणार आहे. पाईपलाईनमुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.

CNG
'समृद्धी'च्या टोल वसुलीची लॉटरी 'या' कंपनीला?

समृद्धी महामार्गाला लागून टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनमधून 16 एमएमएससीएमडी इतका गॅस वहन करण्याची क्षमता आहे. सध्या हे 60 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत 40 टक्के काम आगामी चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर नागरिकांना शहरात, जिल्ह्यात सीएनजी उपलब्ध होईल, असे ‘गेल’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल ही कंपनी देशभरात पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचवण्याचे काम करणारी यंत्रणा आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com