मुंबई (Mumbai) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 2 मे रोजी नागपूर ते सेलू बाजार या 210.60 किलोमीटरच्या टप्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचबरोबर हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही लोकार्पणाचे निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी पहिल्या टप्याची पाहणी केली आणि त्यादरम्यान महामार्गाच्या लोकार्पणाची घोषणा केली.
नागपूर-मुंबई 701 किलोमीटर सहा लेन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणी सुरू आहे. त्यातीलच नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नागपूर-सेलू बाजार पहिला टप्पा तयार झाल्याने त्याचा फायदा लोकांना द्यावा, त्यानंतर पुढचे टप्पे जसे पूर्ण होतील त्याप्रमाणे त्याचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. या संपूर्ण समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. महामार्गाच्या लगत वन्यप्राण्यांसाठी महामार्गावर अंडरपास आणि ओव्हरपास रस्ते बांधण्यात आले आहेत. दोन्ही मार्गावर जंगलासारखे वातावरण तयार केले असून वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात मदत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.
बांधकामांची सध्यास्थिती
स्ट्रक्चरचा प्रकार - एकूण संख्या - प्रगतीपथावरील बांधकाम - पूर्ण झालेले बांधकाम
फ्लायओव्हर/वायाडक्ट - 65 - 37- 28
मोठे पूल - 32 - 7 - 25
रेल्वे ओव्हर ब्रिज - 8 - 3 - 5
छोटे पूल - 274 - 19 - 255
वाहनांसाठी उन्नत मार्ग - 65 - 48 - 17
वाहनांसाठी भुयारी मार्ग - 189 - 17 - 172
हलक्या वाहनांसाठी भुयारी मार्ग - 110 - 7 - 103
पशुसाठी भुयारी मार्ग/ पादचारी भुयारी मार्ग - 209 - 0 - 209
वन्यजीवांसाठी भुयारी मार्ग - 3 - 0 - 3
वन्यजीवांसाठी उन्नत मार्ग - 3 - 2 - 1
पादचारीसाठी उन्नत मार्ग - 19 - 10 - 9
कॅनाल पूल - 20 - 0 - 20
मोऱ्या -672- 30 - 642
इंटरचेंजेस - 24 - 9 - 15
बोगदा - 6 - 6 - 0
एकूण - 1699 - 195 - 1504
प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
- या प्रकल्पासाठी वन विभागाची एकूण 546 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे
- प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण 84 बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी एकूण 326 कोटी रुपयांचा खर्च
- प्रकल्पाच्या बांधकामामधे बाधित झाडांच्या तुलनेत 11 लाख 31 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. सुशोभीकरण, सिंचनाची 5 वर्षे देखभाल करण्यासाठी 694 कोटींचा खर्च
- प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 161 मेगा व्हॅट सौर उर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.