EXCLUSIVE : मुंबई म्हाडा सभापतीपदावरुन राष्ट्रवादीत घमासान

संतोष धुवाळी यांना कात्रजचा घाट दाखवणारे नेते कोण?
MHADA
MHADA

Tendernama

Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) सभापतीपदावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरु आहे. पक्ष नेतृत्वाने सर्वानुमते संतोष धुवाळी यांचे नाव निश्चित केले असताना ऐनवेळी आनंद परांजपे यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे गेल्याने राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमका कुणी हा नेम साधला आहे यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर या नियुक्तीला वेग आला आहे.

MHADA
बसपोर्ट प्रकरण; सिडको प्रशासकासह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

राज्यातील विविध मंडळांवर अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक झाली असताना म्हाडाच्या विविध मंडळावरील सभापती आणि सदस्यांच्या नियुक्तींकडे राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नेत्यांनी अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे.

MHADA
नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठी 'इतक्या' हजार कोटींचे बजेट

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) स्थापना झाली आहे. म्हाडाचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडा सभापती आणि विविध मंडळाचे सभापती यांची नेमूणक करण्यात येते. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर म्हाडा सभापतींसह अन्य मंडळांवर नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही सत्तेत सहभाग घेण्याची इच्छा असते. त्यासाठी म्हाडासारख्या प्राधिकरणातून राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याची संधीही उपलब्ध होते.

MHADA
४५० कोटीत मुंबई-दिल्ली अंतर कसे कमी होणार?

मागील सरकारने नियुक्त्या केलेले काही सभापती कार्यरत आहेत. भाजपचे सभापती रद्द केल्यानंतर मुंबई, कोकण मंडळाचे सभापती पद रिक्त आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती, झोपडपट्टी सुधार मंडळाला सभापती आहेत. मात्र म्हाडाचे सभापती पदही रिक्त आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अजूनही आपल्या वाट्यातील पदे रिक्त ठेवली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने अध्यक्ष, सभापती तसेच सदस्य यांच्या नियुक्त्या लवकर व्हाव्यात, अशी चर्चा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक नेते, कार्यकर्त्यांमध्ये आहे.

MHADA
म्हाडा मुख्यालयाचा पुनर्विकास खासगी विकसकांमार्फत; बिल्डरसाठी...

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने स्व: वाट्यातील मुंबई म्हाडाच्या सभापतीपदासाठी संतोष धुवाळी यांचे नाव निश्चित केले होते. संतोष धुवाळी हे राष्ट्रवादीचे वांद्रे येथील कार्यकर्ते आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर सर्वानुमते हा निर्णय झाला होता. त्यानुसार गृहनिर्माण विभागाकडून धुवाळी यांच्या नावाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणं अपेक्षित होते.

MHADA
म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचे काम पुन्हा होणार सुरु

मात्र, झाले भलतेच. धुवाळी यांच्याऐवजी ठाण्याचे राष्ट्रवादीचे तरुण नेते आनंद परांजपे यांच्या नावाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मान्यतेसाठी गेली. मुंबई म्हाडावर शक्यतो मुंबईतील कार्यकर्ते, नेत्याची नियुक्ती करण्याची परंपरा आहे. पण राष्ट्रवादीने ठाण्यातील व्यक्तीचे नाव पुढे केल्याने राष्ट्रवादीचे हे नेहमीचे धक्कातंत्र असावे या शक्यतेतून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाकडे खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना परांजपे यांचेच नाव अंतिम करायचे आहे अशी माहिती देण्यात आली. पण पुन्हा गोंधळ होऊ नये या भावनेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली. नावातला हा बदल ऐकून तेही गोंधळले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा निर्णय काहीकाळ प्रलंबित ठेवावा अशी विनंती केली. तसेच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे नावातील हा बदल आपल्या सूचनेनुसार झाला आहे किंवा कसे याची खातरजमा केली तेव्हा नावात असा बदल झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समयसूचकतेमुळे ध चा मा होता होता राहिला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com