Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा अपघात; पूल कोसळून...

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमधील (Gujarat) आनंद जिल्ह्यात बांधकाम सुरू असताना एक पूल कोसळून अपघात झाला. बांधकामाच्या ठिकाणी काँक्रिटचे ब्लॉक कोसळले असून, यात काही मजुरांचा मृत्यू झाल्याचे समजते. (Mumbai Ahmedabad Bullet Train Accident News)

Bullet Train
Pune : दीड वर्षांच्या टोलवाटोलवीनंतर अखेर 'त्या' प्रकल्पाचा मार्ग मोकळा

दुर्घटनेनंतर तातडीने मदत व बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) याबाबतची माहिती दिली आहे. नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांब बुलेट ट्रेन प्रकल्प प्रगतीपथावर आहे.

ही घटना गुजरात येथील आनंद जिल्ह्यातील वासद जवळ मंगळवारी घडली. माही नदीजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास पायाभरणीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या स्टील आणि काँक्रिट ब्लॉकची तात्पुरती रचना बांधकामाच्या ठिकाणी लावली जात असताना ही दुर्घटना घडली.

Bullet Train
Mumbai Pune Expressway : नियम मोडणाऱ्यांना आता दणका! संपूर्ण 94 किलोमीटरवर...

गेल्या काही महिन्यांत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी झालेला हा दुसरा जीवघेणा अपघात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात वडोदरा जिल्ह्यातील कंबोला गावाजवळ बांधकाम क्रेनचा काही भाग कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते.

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल व आनंद पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत चार मजुरांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

सुरुवातीला दोन कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेला आणखी एक कामगारही मृतावस्थेत आढळला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आणंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गौरव जसानी यांनी दिली.

Bullet Train
Mumbai : महापालिकेच्या 'त्या' शाळेचा कायापालट; 17 कोटींचे टेंडर

या अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनएचएसआरसीएल बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम करत असून एनएचएसआरसीएलने या घटनेनंतर एक निवेदन प्रसिद्ध करत या अपघाताची माहिती दिली आहे.

यामध्ये म्हटले आहे की, आनंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रिटचे ब्लॉक कोसळले असून यात काही मजुरांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर तातडीने मदत व बचावकार्य हाती घेतले असून यात आनंद पोलिस व अग्निशमन दलाचे अधिकारी हे बचाव कार्य राबवत आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटरचा असून त्यात ताशी ३२० किलोमीटर वेगाने गाड्या धावतील, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पात जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानाचा समावेश आहे आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सहा तासांवरून दोन तासांपर्यंत कमी करण्याचे उद्धिष्ट आहे.

२०२६ मध्ये दक्षिण गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान हायस्पीड ट्रेन सुरू होईल. या प्रकल्पा अंतर्गत गुजरातमधील पाच स्थानकांची कामे शेवटच्या टप्प्यात आली आहेत. तर महाराष्ट्रातील तीन स्थानकांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात बोईसर, विरार स्थानकांचा समावेश आहे.

Bullet Train
Nagpur : मुख्य रेल्वे स्थानक होणार जागतिक दर्जाचे पण 24 महिन्यांत केवळ 35 टक्केच काम

भारतातील मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आतापर्यंत ६६ हजार ३२६ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकूण किंमत १ लाख आठ हजार कोटी रुपये इतकी असल्याने प्रकल्पाने सप्टेंबर महिन्यापर्यंत ६१.४० टक्के इतकी आर्थिक प्रगती साध्य केली आहे. प्रकल्पाच्या एकूण किंमतीमध्ये जमीन अधिग्रहण, बांधकाम आणि रुळांच्या कामांसह इतर खर्चाचा समावेश आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सिव्हिल कामांसाठी गुजरात राज्यात पहिले टेंडर नोव्हेंबर २०२० मध्ये वितरीत करण्यात आले होते. याभागातील प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम एप्रिल २०२१ मध्ये सुरू करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये मात्र बुलेट ट्रेनचे काम २०२३ मध्ये सुरू करण्यात आले होते. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम २८ पॅकेज मध्ये प्रगतीपथावर असून, त्यामध्ये एकूण १२ स्थानके आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील सिव्हिल कामे, डेपो, ट्रॅकच्या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, फक्त महाराष्ट्रामध्ये ट्रॅकच्या कामासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com