BKC स्टेशनचे टेंडर MEIL-HCCच्या खिशात; तब्बल 3,681 कोटींची बोली

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्टेशनचे (Mumbai Ahmedabad Bullet Train - BKC Station) टेंडर बलाढ्य 'ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन' आणि 'एलॲन्डटी'ला मागे सारत एमईआयएल-एचसीसी (MEIL-HCC) कंपनीने पटकावले आहे. कंपनीचे ३६८१ कोटींचे सर्वात कमी दरातील टेंडर पात्र ठरले आहे.

Bullet Train
Ajit Pawar : अजितदादा कडाडले...आश्वासने नकोत, तारीख सांगा!

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन ही बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. ज्या अंतर्गत अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर 320 किमी प्रतितास वेगाने गाड्या चालवल्या जातील.

ही ट्रेन 508 किमी अंतर कापणार असून तिच्या मार्गावर 12 स्थानके असतील. बुलेट ट्रेनमुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा तासांवरुन तीन तासांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने सुमारे १८०० कोटींचा खर्च गृहीत धरून हे टेंडर जुलै महिन्यात प्रसिद्ध केले होते. मात्र, विक्रोळी गोदरेज कंपनीसोबतच्या जमिनीच्या वादामुळे टेंडरला मुदतवाढ दिली होती. टेंडर उघडल्यानंतर यात ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शने ४२१७ कोटी, एलॲन्डटीने ४५९० कोटींचे टेंडर सादर केले आहे. तर मुंबईत मेट्रोचे जाळे उभारणारी जे कुमार कंपनी अपात्र ठरली आहे. स्पर्धेत सर्वात कमी दराचे टेंडर एमईआयएल-एचसीसी कंपनीचे होते. तेच पात्र ठरले आहे.

Bullet Train
Good News: 'समृद्धी'चा 85 किमीचा शिर्डी ते इगतपुरी टप्पा पूर्ण

बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकाकरिता 467 मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी तसेच 66 मीटरच्या टनेल व्हेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी हे टेंडर मागविण्यात आले होते. पॅकेज सी-1 अंतर्गत बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे अनुक्रमे 36, 56 आणि 39 मीटर खोल जमिनीत टीबीएम मशिनसाठी शाफ्ट टाकण्यात येणार आहेत.

बुलेट ट्रेनचे वांद्रे – कुर्ला संकूल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. त्यासाठीही टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

राज्यात उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिंदे सरकार येताच नव्या सरकारने बीकेसीतील जागा त्वरित नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे हस्तांतरीत केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com