काळू धरणाच्या भूसंपादनाला दलालांचा विळखा! ९५० कोटींचा खर्च...

Kalu River
Kalu RiverTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) व मुंबईकरांची (Mumbai) तहान भागवण्यासाठी मुरबाड (Murbad) तालुक्यातील चासोळे गावात काळू धरण (Kalu Dam) बांधण्यात येणार आहे. काळू धरणासाठी १८ गावे व २३ वाड्यांची जमीन बाधित होणार आहे. या धरणाकरिता ९४० कोटी रुपये एवढा अपेक्षित खर्च असून, सरकारी पातळीवर धरण बांधण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. धरणासाठी लागणाऱ्या सुमारे ७०० हेक्टर जमिनीचा सरकारी मोबदला लाटण्यासाठी परिसरात दलालांची टोळी सक्रिय झाली आहे.

Kalu River
कंत्राटदारांच्या अनधिकृत संघटनेची बीडमध्ये दादागिरी

अनेक धनदांडग्यांनी भूमिपुत्रांची फसवणूक करून जमिनी विकत घेतल्या असून, मूळ मालकांना मात्र कोणताही मोबदला आता मिळणार नाही. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान धरणासाठी भूसंपादन करताना मूळ मालकांना सरकारी मोबदला मिळाला नाही तर थेट न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

Kalu River
पाच शेळ्या पळवल्या कोणी? नागपूर झेडपीत आणखी एक घोटाळा

धरणासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. मात्र अनेकांनी आतापासूनच स्वस्तात स्थानिकांकडून जमीन खरेदीचा सपाटा लावला आहे. परस्पर स्वत:च्या नावावर सातबारा केला असून, बोगस कागदपत्रे देखील बनवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमीन खरेदीमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाला असून, मूळ मालकांना मात्र देशोधडीला लावण्याचा डाव धनिकांनी आखला आहे.

Kalu River
चौक सोडून रस्त्यांचे काँक्रिटीकरण; कंत्राटदारांसाठी आता चौकांचे...

काळू धरणासाठी जमीन संपादित केल्यास मालकाला सरकारी दराने मोबदला मिळेल. हा मोबदला लाटण्यासाठीच आतापासून स्थानिक शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेण्यास सुरवात झाली आहे.
स्थानिक भूमिपूत्र व शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत दलाल व पोटदलाल हे सक्रिय झाले आहेत. खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी लाखोंचे व्यवहार करण्यात येत असून, झारीतील शुक्राचार्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Kalu River
अदानी समूहाला 'या' प्रकल्पासाठी बँकेची 12 हजार 770 कोटींची कर्जहमी

ठेकेदारांच्या संगनमताने काळू धरणासाठी जमिनी खरेदी करण्याचा प्रकार हा धक्कादायक असून, या फसवणूक प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात देखील तक्रारी केल्या आहेत. याची सखोल चौकशी करावी व जमिनीचा मोबदला मूळ मालकांनाच द्यावा, अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे. न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अ‍ॅड. वैशाली म्हस्कर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com