Mumbai-Ahmedabad Bullet Train : मार्गावरील 'त्या' महत्त्वाकांक्षी पुलाचे मिशन सक्सेस

Bullet Train
Bullet TrainTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देशातील पहिल्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलक नदीवरील नदी पुलाचे काम पूर्ण झाल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉरीडॉरने सांगितले आहे. या पुलाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पुलाची लांबी 160 मीटर इतकी आहे. हा पूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. बुलेट ट्रेनचा बिलीमोरा ते सुरत हा पहिला टप्पा सन २०२६ मध्ये सुरु होणार आहे.

Bullet Train
Mumbai : वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोड प्रकल्प: पायाभूत कामे करताना नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग एकूण २४ नदीपुलांवरुन जाणार आहे. यापैकी ९ नदी पुलांचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील नद्यांवर चार पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात दोन पुलांची उभारणी उल्हास नदीवर तर एका पुलाची उभारणी वैतरणा नदीवर अन्य एका पुलाची उभारणी जगनी नदीवर होत असून या तिन्ही नद्या पालघर जिल्ह्यातील आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोलक नदीवरील नदी पुलाचे काम पूर्ण झाल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉरीडॉरने म्हटले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील या नदीपुलाचे बांधकाम सुरु होते ते आता पूर्ण झाले आहे. या कोलक नदीवरील पुलाचे वैशिष्ट्ये म्हणजे या पुलाची लांबी 160 मीटर इतकी आहे. यात चार फूल स्पॅन गर्डरचा ( प्रत्येकी 40 मीटर ) वापर करण्यात आला आहे. पिअर्सची उंची 14 ते 23 मीटर इतकी आहे. एका खांबाचा व्यास पाच मीटर तर अन्य एका खांबाचा व्यास चार मीटर इतका मोठा आहे. हा नदीपूल वापी आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे. दोन स्थानकांदरम्यान औरंगा आणि पार नदी अशा दोन नद्या आहेत. कोलक नदी वालवेरीजवळील सापुतारा डोंगरातून उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. कोलक नदी वापी बुलेट ट्रेन स्थानकापासून 7 किमी अंतरावर आणि बिलिमोरा बुलेट ट्रेन स्थानकापासून 43 किमी अंतरावर आहे. 350 मीटर लांबीचा आणि 12.6 मीटर व्यासाचा पहिला बोगदा गुजरातमधील वलसाड येथील झारोली गावाजवळ पूर्ण झाला असून तो डोंगरातून जातो.

Bullet Train
Mumbai : महापालिकेचा 'त्या' रुग्णांना मोठा दिलासा; 10 मजली स्वतंत्र रुग्णालय बांधणार

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची चार स्थानके आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे महाराष्ट्रातील सुरुवातीचे स्थानक बीकेसी येथे आहे. या अंडरग्राऊंड स्थानकासाठी मोठा खड्डा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात आता टीबीएम मशीन टाकण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंनी बोगदा खणण्याचे काम सुरु होणार आहे. बीकेसी आणि शिळफाटा येथील या बोगदा 21 किमी बोगद्याचे काम सुरु असून या बोगद्याचा 7 किमी भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. ठाणे, विरार आणि बोयसर स्थानकाची कामे सुरु आहेत. या उन्नत मार्गासाठी खांब उभारण्यासाठी 100 हून अधिक फाऊंडेशनची कामे अलीकडेच पूर्ण झाली आहेत. तर पालघर जिल्ह्यात डोंगरात पाच बोगदे खोदण्याचे काम सुरु झाले आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com