अन् अडीच वर्षे रखडलेला 'हा' प्रकल्प अवघ्या काही तासात ऑन ट्रॅक...

Kapil Patil
Kapil PatilTEndernama
Published on

मुंबई (Mumbai) : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मान्यता दिलेल्या पण गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या मुरबाड रेल्वेचे काम आता पुढील अडीच वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. लवकरच या कामाचे टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Kapil Patil
फडणवीस-शिंदेचा मोठा निर्णय! बुलेट ट्रेन निघाली सुसाट...

सोमवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर काही तासातच कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने तातडीने रेल्वे बोर्डाला पाठविले. या पत्रामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Kapil Patil
फडणवीसांनी पुन्हा आणले; मुंबई मेट्रोची जबाबदारी अश्विनी भिडेंकडे

बहुप्रतीक्षित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. २०१९ साली हा मार्ग अधिकृतपणे घोषित करण्यात आला होता. या कामासाठी आणि काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के खर्च उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. गेल्या अडीच वर्षांत याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. त्यामुळे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५० टक्के खर्चाला मंजुरी देत त्यासाठी हमी पत्र रेल्वे बोर्डाला देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार सोमवारीच राज्य सरकारच्या गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव आर. एम. होळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठवत ५० टक्के खर्चाची हमी घेतली आहे.

Kapil Patil
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प गुंडाळला? आता या मार्गावर होणार...

या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने ५० टक्के खर्चाची शाश्वती दिल्यामुळे आता टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दर्शविल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com