'चव्हाणांनी केलेला १०० मीटरचा रस्ता अंदाजपत्रकानुसार असेल तर...'

Ashok Chavan
Ashok ChavanTendernama
Published on

नांदेड (Nanded) : येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक कामांत गैरव्यवहार होत आहे. तीन वर्षांपूर्वी बोगस डांबर चलनाद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही केवळ कंपनीचे नाव बदलून त्याच व्यक्तींना कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. अशा कामांद्वारे या विभागातील अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला.

Ashok Chavan
मुंबईतील 'तो' धोकादायक ब्रीज नव्याने बांधणार; १७ कोटींचे टेंडर

कथित डांबर गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) जबाब नोंदवण्यासाठी बंब सोमवारी येथे आले होते. त्यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर गैरव्यवहार प्रकरणी सततच्या तक्रारींमुळे संबंधित कंपनीच्या काही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संबंधितांकडून काम काढून घेण्यात आले. मात्र, एका रात्रीत दुसरी कंपनी स्थापन करून जी. जी. कन्स्ट्रक्शनची गार्गी ऍन्ड गार्गी या नावाने कंपनी स्थापन करून पूर्वीच्या कंपनीतील सर्व कार्यकारिणी या कंपनीत घेण्यात आली. त्यांनाच पूर्वी ३२ कोटींना दिलेले टेंडर आठ दिवसांनी ३८ कोटींना देण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर तक्रार केली होती. या प्रकरणाची एसीबी, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही, पुरावे देऊनही तीन वर्षापासून चौकशीही करण्यात आली नाही.

Ashok Chavan
मुंबई-गोवा महामार्गाच्या 'या' टप्प्याचे लवकरच काँक्रिटीकरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातच बांधकाम विभागात प्रचंड गैरव्यवहार होत आहे. चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील शंभर मीटरचा एखादा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केल्याचे दाखवले तर मी आमदारकी तर सोडेनच पण आयुष्यात पुन्हा राजकारणही करणार नाही.

- प्रशांत बंब, आमदार

आमदार बंब यांनी दिलेल्या तक्रारींसंदर्भात विभागाकडून आधीच चौकशी झाल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी विधिमंडळ अधिवेशनात सांगितले होते. तरीही बंब हे जाणीवपूर्वक चौकशी होत नसल्याचे रडगाणे गात आहेत. चव्हाण यांनी पालकमंत्री म्हणून सूत्रे हाती जिल्ह्याचा खुंटलेला विकास पुन्हा गतिमान झाला आहे. महाविकास आघाडी व पालकमंत्र्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- अमर राजूरकर, आमदार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com