EXCLUSIVE : भाजप सत्तेत येताच महामुंबई 'अदानी'ला आंदण!

Adani Group
Adani GroupTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्यात भाजप (BJP) सरकार सत्तेत येताच नवी मुंबई 'अदानी'ला आंदण देण्याची तयारी सूरु झाली आहे. 'अदानी' समूह (Adani Group) आता मुंबई (भांडूप, मुलूंड), ठाणे (ठाणे, नवी मुंबई) आणि रायगड (खारघर, तळोजा, पनवेल, उरण) या परिसरातील वीज वितरण हक्क ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. अपेक्षेप्रमाणे, सार्वजनिक आक्षेपांना न जुमानता वीज नियामक आयोग (एमईआरसी) लवकरच 'अदानी'चा अर्ज मंजूर करण्याची दाट शक्यता आहे. सध्या या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महावितरण कंपनीकडून वीज मिळत आहे. 'अदानी'ने यासंदर्भात शनिवारीच (ता.२६) एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.

Adani Group
मुंबई-बडोदा ई-वेचे काम 'टॉप गिअर'मध्ये सुरू; 901 हेक्टर भूसंपादन..

अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेडने (AENML) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) हा अर्ज (केस क्रमांक 173 2022) सादर केला आहे. वीज कायदा, 2003 ("अधिनियम") च्या कलम 14 च्या 6 व्या तरतुदीनुसार एमईआरसी (वितरण परवान्याच्या सामान्य अटी) विनियम, 2006 च्या तरतुदींसह 'अदानी' ला वितरण परवाना मंजूर करण्यासाठीचा हा अर्ज आहे. आयोगाने 25 नोव्हेंबर 2022 रोजी हा अर्ज स्वीकारला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) या तिच्या उपकंपन्यांद्वारे वांद्रे ते पश्चिमेकडील मीरा-भाईंदर आणि पूर्वेकडील सायन ते मानखुर्द या मुंबई उपनगरी भागात आणि आसपासच्या ग्राहकांना वीजेचा पुरवठा करत आहे. कंपनीचे सध्या ३१ लाख वीज ग्राहक आहेत. कंपनी 2,000 मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करत आहे.

Adani Group
Good News! जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी 74 कोटींचे टेंडर

कंपनी मुलूंड, भांडूप, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबईचा समावेश असलेल्या प्रस्तावित परवाना क्षेत्रात वितरण नेटवर्क विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा आणि उरण या प्रस्तावित क्षेत्रासाठी कंपनीने वितरण परवाना मागितला आहे. सध्या हा परिसर महाराष्ट्र राज्य वीज वितरण क्षेत्रात येतो. वितरण परवाना मिळाल्यानंतर प्रस्तावित परवाना क्षेत्रामध्ये वीज पुरवठा विश्वसनीयरित्या पुरवण्यास सक्षम आहे, असा दावा कंपनीने केला आहे. प्रस्तावित क्षेत्रांमध्ये काही नगरपरिषद किंवा महानगरपालिका जसे की बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, पनवेल महापालिका, उरण नगरपरिषद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे क्षेत्र पूर्ण किंवा अंशतः समाविष्ट आहे. परवाना मिळाल्यापासून 5 वर्षांच्या आत 5 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.

Adani Group
धारावी पुर्नविकासात 'डीएलएफ' दावेदार? 'अदानी', 'नमन'चेही टेंडर

महाराष्ट्रात महावितरणच्या परिसरात विस्तार करण्याची 'अदानी'ची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यानिमित्ताने महाराष्ट्रातील वीज वितरण क्षेत्र खासगीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहे. नवी मुंबईचा परिसर हा महावितरणला घसघशीत महसूल देणाऱ्या राज्यातील निवडक परिसरांपैकी एक आहे. शिवाय भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळेच अदानीने महाराष्ट्रात आपला वीज व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबईची निवड केली आहे. 'अदानी'ने वितरण परवाना मंजूर करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सूचना प्रसिद्धीस दिली आहे. त्यावर पुढील महिनाभर लोकांकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com