मोठी बातमी : 2450 कोटी खर्चून 'असा' बदलणार CSMTचा चेहरा मोहरा

CSMT
CSMTTendernama
Published on

मुंबई (Mumba) : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा (CSMT) पुनर्विकास 'अहलुवालिया कन्स्ट्रक्शन' कंपनी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला मागे टाकत अहलुवालिया कन्स्ट्रक्शनने हे टेंडर पटकावले आहे. कंपनीची २,४५० कोटींची सर्वात कमी दराची बोली यशस्वी ठरली आहे.

CSMT
Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास करण्याची योजना जाहीर करत रेल लॅण्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (आरएलडीए) सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी इच्छूक कंपन्यांकडून टेंडर मागवली होती. त्यासाठी 1800 कोटी रुपये एवढा प्राथमिक खर्च प्रस्तावित केला होता. टेंडरसाठी लार्सन ऍण्ड टुब्रो, ऍफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन या चार कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या होत्या.

बुधवारी प्रकल्पाचे आर्थिक टेंडर उघडण्यात आले, त्यामध्ये सर्वात कमी 2450 कोटींचे टेंडर अहलुवालिया कंपनीने भरल्याचे स्पष्ट झाले. तर लार्सन ऍण्ड टुब्रो 4141 कोटी, ऍफकॉन इफ्रास्ट्रक्चर 3910 आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शनने 3667 कोटी रुपयांचे टेंडर भरले होते. त्यामुळे पुनर्विकासाचे काम अहलुवालिया कंपनीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच सीएसएमटीचा कायापालट सुरु होणार आहे.

CSMT
राज्य सरकारने का रोखले कर्मचाऱ्याचे वेतन, ठेकेदारांची देयके?

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) इमारत हे मुंबईत येणार्‍या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे. सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरविण्याचे या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतला आहे. सीएसएमटी स्थानकाचे पुनर्विकासाचे काम अडीच वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. पुर्नविकासाचे काम हायब्रीड बील्ड ॲापरेट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगी कंपनीची ६० टक्के गुंतवणुक असणार आहे.

CSMT
Nashik: TCS राबवणार महापालिकेतील 704 जागांची भरती प्रक्रिया

सीएसएमटी स्थानकाच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. 2.54 लाख चौरस मीटरची जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे.

फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहणार आहेत.

CSMT
Pune: 'या' नोकरीसाठी अर्ज भरला का? आज आहे शेवटची संधी

पुनर्विकासाचे वैशिष्ट्ये
- सीएसएमटी स्थानकाचे वैभव जतन केले जाणार
- सर्व प्रवासी सुविधांसह विक्रेते, कॅफेटेरियासाठी जागा, पादचारी पूल रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी स्वंत्रण ठिकाणे
- पार्किंगची सुविधा, रूफ प्लाझा आधुनिक सुविधांयुक्त प्लॅटफॉर्म, लिफ्ट/एस्केलेटर/ ट्रॅव्हेलेटरची सुविधा, दिव्यांगजनांसाठी सुविधा, सौरऊर्जा, जलसंवर्धन - पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन
- एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com