720 कोटींच्या 'या' मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी भविष्यवाणी

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : विदर्भाचे पंढरपूर असलेले धापेवाडा (Dhopewada) आणि गणेश मंदिर असलेले अदासा (Adasa Ganesh Temple) या तीर्थ स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सावनेर-धापेवाडा-गोंडखैरी हा चौपदरीकरण झालेला मार्ग नागरिकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या मार्गावरील उड्डाणपुलावर, अंडरपासच्या बाजूला असलेल्या भिंतींवर विठ्ठल-रखुमाई, अदासाचा गणपती त्याचप्रमाणे कोलबा स्वामी यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र व रोषणाई करण्यात येणार आहे. त्यामुळे चौपदरीकरण झालेला हा रस्ता भक्तीमार्ग होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari
'या' कारणामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची पुन्हा रखडपट्टी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (NHAI) सावनेर-धापेवाडा-गोंडखैरी या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते धापेवाडा येथे झाले. या मार्गावर, तसेच अदासा मार्गावर ९ कोटी रुपयांचे विद्युतीकरणाचे काम मंजूर झाले असून, पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० लाख रुपये मंजूर केल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. या चौपदरीकरणाची एकूण लांबी २८.८८ किलोमीटर असून, यासाठी ७२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या रस्त्यावर बांधलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज, अंडरपासमुळे कळमेश्वर शहर, तसेच नागपूर शहरातून सावनेर कळमेश्वरकडे येणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. या रस्त्याच्या बांधकामामध्ये २.४ किलोमीटर लांबीचा एक रेल्वे उड्डाणपूल त्याचप्रमाणे ३ अंडरपास आणि १ ओव्हरपासचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Nitin Gadkari
परप्रांतीय जनावरे खरेदीच्या अटीने कंत्राटदार अडचणीत

गडकरी म्हणाले, जिल्ह्यात ५० हजार कोटींच्या कामापैकी ३० हजार कोटींची कामे पूर्ण झाली. नागपूर शहरात १ लाख कोटींपेक्षा जास्त विकास कामे झालीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या कामातून निघालेल्या मातीचा रस्ता बांधकामात उपयोग होत आहे. त्यामुळे तयार झालेल्या खोलीकरणातून तसेच शेततळ्यातून जलसंवर्धन सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.

Nitin Gadkari
पश्चिम रेल्वेचं पुढचं पाऊल! 'या' कामात 6 महिन्यांत 150 कोटीची कमाई

विशेष म्हणजे अदासा हे गडकरी यांचे मूळ गाव आहे. येथील गणेश मंदिर अतिशय प्राचीन आहे. गडकरी पालकमंत्री असताना या मंदिराचा त्यांनी कायापालट केला होता. अतिशय निटनिटकी व्यवस्था आणि सौंदर्यीकरणामुळे हे मंदिरा आता पर्यटन स्थळ बनले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com