Anil Ambani यांच्यावर मोठी कारवाई; टेंडरमध्ये सहभागी होण्यास का घातली बंदी?

Anil Ambani
Anil AmbaniTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कर्जाच्या बोज्यातून सावरत असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (SECI) मोठा झटका दिला आहे.

Anil Ambani
Solapur : समांतर जलवाहिनीमुळे वाचणार 15 TMC पाणी; काम महिनाभरात पूर्ण होणार?

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर सोलर एनर्जीवर सरकारच्या कोणत्याही टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यावर ३ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. रिलायन्स पॉवरने टेंडर प्रक्रियेत एसईसीआयला दिलेली बँक हमी बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.

Anil Ambani
Mumbai : बांधकाम कामगारांच्या योजनांचा मार्ग मोकळा; हायकोर्टाच्या आदेशाने ‘तो’ निर्णय रद्द

अदानी पॉवर ऊर्जा उद्योगाचा सध्या जोरदार विस्तार झाला आहे. ही ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली आहे. दुसरीकडे अनिल अंबानी यांनी सुद्धा गौतम अदानी यांच्या कंपनीचा मुकाबला करण्यासाठी रिलायन्स पॉवरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अनिल अंबानी यांनी सौरऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी मागणी असलेली कंपनी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी रिलायन्स पॉवरने एसईसीआयने मागवलेल्या टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. मात्र टेंडर प्रक्रियेत त्यांनी दिलेली बँक हमी बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.

कंपन्या बुडाल्यानंतर कर्जामुळे अनिल अंबानी यांची अनेक बँक खाती आणि व्यवहार गोठवण्यात आले आहेत. तर काही खाती जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरने एसईसीआयला बनावट बँक हमी देऊन टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता.

Anil Ambani
Karad : का रखडले 'या' महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम?

सौरऊर्जेची टेंडर रिलायन्स पॉवरकडे जाण्याची शक्यता होती. परंतु टेंडर प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात कागदपत्रांची छाननी करण्यात आली. यावेळी रिलायन्स पॉवरने दिलेली बँक गॅरंटी बनावट असल्याचे आढळून आले. बनावट बँक हमी दिल्यामुळे रिलायन्स पॉवरला सौरऊर्जा टेंडर प्रक्रियेतून निलंबित करण्यात आले. यानंतर रिलायन्स पॉवरला पुढील तीन वर्षांसाठी सरकारच्या कोणत्याही टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे आज बाजार उघडताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. 3 ऑक्टोबर रोजी रिलायन्स पॉवरचा शेअर 54 रुपयांवर होता, मात्र आता शेअरची किंमत 41.47 रुपयांवर घसरली आहे.

Anil Ambani
Nashik : पंधराव्या वित्त आयोग कामांच्या पडताळणीसाठी पोर्टल; आशिमा मित्तलांकडून आढावा

दरम्यान, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर रिलायन्स पॉवर कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कंपनीने म्हटले की, या प्रकरणात 16 ऑक्टोबर 2024 रोजी तिसऱ्या पक्षाविरोधात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. परंतु ही अनावश्यक कारवाई असून आम्ही कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करू.

तसेच कंपनीच्या 40 लाखांहून अधिक भागधारकांच्या हितासाठी आमच्यावरील अनावश्यक कारवाईला कायदेशीर आव्हान देऊ, असे कंपनीने म्हटले आहे.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरची उपकंपनी रोजा पॉवर सप्लाय कंपनीने नुकतीच सिंगापूरस्थित कर्जदार वर्डे पार्टनर्सला 485 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com