औरंगाबादमधील नवीन बीड बायपासच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख

Aurangabad

Aurangabad

Tendernama

Published on

औरंगाबाद (Aurangabad) : रस्त्याची किरकोळ कामे वगळता जवळपास सर्व पूर्ण झाली आहेत. त्यामुळे केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची वाट पाहत आमचा अंत पाहू नका; नकार दिला तर ऑनलाईन उद्घाटन करा अशी मागणी नव्याने बांधण्यात आलेल्या बीड बायपास (Beed Bypass) रस्त्याचा वापर होणाऱ्या नागरिकांनी केला आहे.

औरंगाबाद-सातारा परिसरातील नव्या बीड बायपास रोड १५ नोव्हेंबरला हा रस्ता वाहतूकीस खुला होणार काय, असा प्रश्न भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांना विचारले असता त्यांनी केवळ अंदाज व्यक्त करत प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे या नव्या बायपासच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख होत असल्याची शंका सातारा देवळाईतील लोक व्यक्त करत आहेत.

Aurangabad

म्हाडा परीक्षा;टेंडरनामाने 'जीए'च्या घोटाळ्याकडे आधीच वेधलेले लक्ष

शहरातील जुना बीड बायपास हा दोन पदरी रस्ता धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरच होता. मात्र आता या मार्गाचे आडगाव, निपानी, गांधेली, बाळापुर आणि देवळाई, सातारा, पुढे कांचनवाडी, विटखेडा ते वाळुज महानगर ते करोडी औरंगाबाद-मुंबई महामार्गाला हा रस्ता जोडण्यात आला आहे. अर्थात हा मार्ग शहराबाहेरुन म्हणजे आडगाव ते करोडी असा 30 किलोमीटर लांबीचा करण्यात आला आहे. दरम्यान या नव्या बीडबायपास रोडचे काम देखील पूर्ण झाले आहे. आता तो वाहतुकीसाठी लवकर खुला केला तर जुन्या बीड बायपासवरील जड वाहतूकीचा तान मिटून सातारा देवळाईसह बीड बायपासवासियांना दिलासा मिळू शकतो. मात्र या गुळगुळीत रस्त्याच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना औरंगाबादमध्ये निमंत्रित करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात जर त्यांनी नकार दिल्यास संबंधित विभागाने ऑनलाईन उद्घाटन करावे असा सल्ला काही तज्ज्ञमंडळी प्राधिकरणाला देत आहेत.

Aurangabad

ठाण्यातील कौसा रुग्णालयाचा खर्च २७ कोटींवरुन १४७ कोटींवर

आडगाव ते करोडी 30 किमी लांबीचा रोड

नवा बीड बायपास रोड हा आडगाव ते करोडी असा 30 किमी लांबीचा आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना हा मार्ग शहराबाहेरून गेला आहे. आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा हा ३० किमीचा रस्ता आहे.

Aurangabad

कर्जाच्या चक्रात फसलेल्या एसटी महामंडळाची अशीही फसवाफसवी

तीन वर्षात झाला तीस किमीचा रस्ता

या नवीन बायपासचे काम २०१८ मध्ये सुरू झाले होते. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिलेली होती. मात्र, कोरोनामध्ये मजूर, अभियंते आपापल्या गावी गेल्याने हे काम रखडले होते. त्यामुळे एनएचएआयने ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ठेकेदाराने नोव्हेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचे काम किरकोळ काम वगळता मेजर कामे पूर्ण केली आहेत.

Aurangabad

औरंगाबादमध्ये १२० कोटींचे टेंडर फुगणार; …पैसाही जाणार

११२ पुलांचा रस्ता

३० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर लहान-मोठे एकूण ११२ पूल आहेत. तसेच कांचनवाडी (पैठणरोड) एएस क्लब येथे दोन उड्डाणपूल आहेत. या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण साडेसहाशे कोटीच्या आसपास खर्च झाला आहे. रस्त्यावर कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोड देखील आहे. तर आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथे भुयारी मार्ग देखील आहेत.

Aurangabad

'समृद्धी'च्या कंत्राटदाराला कोर्टाचा दणका; ७५० कोटींचे होते टेंडर

जुन्या बीडबायपासच्या कामामुळे नागरिक हैराण

सध्या औरंगाबाद शहराच्या आतून जाणाऱ्या जुन्या बीडबायपास रोडवरील पुलाचे कामही सुरु आहे. भर पावसाळ्यात या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आताही रस्त्याचे काम अजून सुरुच असल्याने या रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातदेखील घडत आहेत. नवीन बीड बायपासचे काम ९० टक्के झाले आहे. त्यामुळे रस्ता गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे प्रयत्नशील आहेत. मात्र जर त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले, तर पुन्हा उद्घाटनासाठी तारीख पे तारीख देऊ नका.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com