रस्ते घोटाळा प्रकरणी क्लिन चिट! बच्चू कडूंना बंडखोरीचे बक्षिस?

Bachchu Kadu
Bachchu KaduTendernamahbg
Published on

मुंबई (Mumbai) : शिवसेनेतील बंड आणि त्यापार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याचा काल पासून दुसरा अंक सुरू झाला आहे. आपल्याच आमदारांनी धोका दिल्याचे स्पष्ट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि बंडखोरांच्या पाठिंब्यावर सत्तेवर येण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच यशस्वी होत असतानाच पडद्यामागे इतरही अनेक घटना घडत आहेत. ठाकरे सत्तेतून पायउतार होताच अवघ्या काही तासांमध्ये बंडखोर आमदारांमध्ये सहभागी असलेले मंत्री बच्चू कडू यांच्याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. (Bachchu Kadu Gets Clean Chit)

Bachchu Kadu
कोरोनाच्या लाटेत घोटाळ्याची भरती; मुदत संपलेल्या औषधांचे...

तीन रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर वंचित आघाडीकडून करण्यात आला होता. हे प्रकरण कडू यांच्यावर चांगलेच शेकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता या प्रकरणात कडू यांना क्लिन चिट देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशीरा रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकराणाला नवं वळण लागल आहे. एकिकडे सरकार कोसळत असताना बंडखोर आमदार बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे.

Bachchu Kadu
६,६७२ कोटींचे बजेट असलेल्या 'या' मेट्रोचे ५८ टक्के काम पूर्ण

अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.

Bachchu Kadu
सरकार बदलल्यास नागपूर सुधार प्रन्यासचे काय होणार? कर्मचारी चिंतेत

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडूंनी कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे.

Bachchu Kadu
कंत्राटदार कंपनीचा अजब कारभार; १४ कोटी खर्च करूनही

यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सोबतचं प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्जही केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसासर कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com