औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण 4 महिन्यांची प्रतिक्षा; 490 कोटींचे टेंडर

Aurangabad-Paithan
Aurangabad-PaithanTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पैठण-औरंगाबाद रस्ता चौपदरीकरण कामाचा ठेका भाजपचे जालना जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे हे जाॅईंट व्हेंचर असलेल्या ओजेएससी एव्हरस्काॅन या कंपनीला मिळाला. इतर बारा कंपन्यापेक्षा त्यांनी तब्बल ४१.२ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने हे काम सदर कंपनीला मिळाले. सदर रस्ता बांधकामाच्या एकूण ४९० कोटी एवढे टेंडर रकमेतून २८९ कोटीत हे काम होणार आहे. आता संबंधित कंपनीकडून बॅक गॅरंटी, सुरक्षा अनामत रक्कम भरून घेतल्यानंतर साधारणतः तीन महिन्यात काम सुरू होईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी टेंडरनामाशी बोलताना स्पष्ट केले.

Aurangabad-Paithan
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

ओसीएससी एव्हरकाॅन कंपनीला काम मिळताच माजी आमदार संजय वाघचौरे यांना रस्ता बांधकामाची काळजी पडली आणि एवढ्या कमी दरात दर्जेदार काम कसे होईल? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी दानवे हे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ असल्याने वशिल्यात काम मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र टेंडर प्रक्रिया ही ऑनलाईन असते, यात गोपनीय बाबी कुणालाही कळत नाहीत. त्यामुळे मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचा पदाधिकारी असलो तरी कामात कुठेही तडजोड करणार नाही बांधकाम दर्जेदारच असेल असे प्रतिउत्तर वाघचौरे यांना त्यांनी दिले आहे. 

Aurangabad-Paithan
औरंगाबाद : 'त्या' दुभाजकाची तोडफोड सुरू; पण निकृष्टतेची झालर कायम

यासंदर्भात प्रतिनिधीने एनएचएआयचे अभियंता अनिकेत कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी हा प्रोजेक्ट इपीसी इंजिनिअरींग प्रोकाॅरमेंप ॲन्ड कलेक्शन या नुसार आहे. कांचनवाडी रिंगरोड ते पैठण प्राधीकरण पर्यंत ४२ कि.मी. चे डांबरीकरण असल्याचे ते म्हणाले. अस्तित्वातील ३० मीटर रूंदीतच चौपदरीकरण करणार आहोत. यात वाहतूकीसाठी १७ मीटरचे मेन कॅरेजवेचे डांबरीकरण एक मीटरचा दुभाजक आणि दोन्ही बाजुला दोन मीटरचा शोल्डर असणार असेही कुलकर्णी यांनी सांगितले. कंपनीचा स्वतःचा डांबर प्लॅट आणि सर्व मशिनरी असल्याने त्यांना हे काम परवडणारे आहे, असे देखील ते म्हणाले. कसेही असले तरी टेंडरनामाचे या रस्ता बांधकामाकडे सुरूवातीपासून शेवटपर्यंत लक्ष असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com