औरंगाबादेतील वाहतूक कोंडीवर महापालिकेने शोधला 'हा' उपाय

Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal CorporationTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : शहराची सतत वाढ लक्षात घेता येणाऱ्या काळात वाहतूक सुव्यवस्था व शहराचे राहणीमान वाढवण्यासाठी औरंगाबाद महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी शहरात पार्किंग पॉलिसी लॉन्च करणार आहेत. मनपा आयुक्तांच्या मंजुरी नंतर पॉलिसीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच शहरात पार्किंगची सुव्यवस्था दिसून येईल.

Aurangabad Municipal Corporation
कार्ल्यात 'टॅंकरमाफियां'कडून दररोज 1 कोटीची लूट; जबाबदार कोण?

मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू होते. मनपा उपायुक्त आणि स्मार्ट सिटीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे यांच्या देखरेखीखाली स्मार्ट सिटी टीम आणि मुंबई येथील वाहतूक तज्ज्ञ तृप्ती अमृतवार वैतला आणि अशोक दातार हे पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम करत होते. यासाठी अर्बन रिसर्च फाउंडेशन या संस्थेने मदत केली. अथक प्रयत्नानंतर पॉलिसी तयार झाली असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर या धोरणाला मंजुरी मिळाली आहे. ह्यासाठी आयटीडीपी ही संस्था मनपाला सहकार्य करत आहे.

Aurangabad Municipal Corporation
CNG बाबत नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर...

ही पॉलिसी शहरात राबवण्यासाठी स्थानिक स्टार्टअप कर्बलेट सोबत करार करण्यात आला आहे. हा स्टार्टअप नावीन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञान युक्त उपाययोजनेदद्वारे पार्किंगचे व्यवस्थापन करणार आहे. शहरातील सात जागांवर प्रायोगिक तत्त्वावर हा पायलट प्रोजेक्ट होणार आहे. कॅनॉट प्लेस, जिल्हा न्यायालयाची विरुद्ध बाजू, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर, निराला बाजार आणि सूतगिरणी या सात ठिकाणांवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या संस्थेद्वारे मनुष्यबळ, मार्किंग, साइन बोर्ड इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या पॉलिसी अंतर्गत पार्किंग झोन, नो पार्किंग झोन आणि फ्री पार्किंग झोन अशी मार्किंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्बलेट या संस्थेच्या मोबाईल ॲपद्वारे नागरिक आपली गाडी पार्क करण्यासाठी स्वतः जागा निवडू शकतात. यामुळे त्यांना त्यांची गाडी लवकर सापडण्यास मदत होईल.

Aurangabad Municipal Corporation
Khadki: जुन्या मुंबई-पुणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने टेंडर

या प्रकल्पामुळे शहरातील ट्राफिक जाम सारखी समस्या, वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण इत्यादी समस्या सुटण्यास मदत होईल आणि पार्किंगसाठी होणारा त्रासही वाचेल. शहरातील रस्त्यांवर पार्क होणाऱ्या गाड्यांना जागा मिळेल त्यामुळे रस्ता मोकळा होईल आणि पायी चालणाऱ्याचा अडथळा देखील दूर होईल. आज या पॉलिसीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मनपा सोबत स्टार्टअपने एक करार केला आहे. 24 महिने कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रशसकांच्या निर्देशानुसार तृतीयपंथी समाजाच्या लोकांना पार्किंगच्या व्यवस्थापनामध्ये संधी देण्यात येणार आहे.मया प्रकल्पासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com