Ambulance Scam : 'टेंडरनामा'मुळे उद्धव ठाकरेंनी वाजवले शिंदे सरकारचे 'सायरन'

Ambulance Scam
Ambulance ScamTendernama
Published on

नाशिक (Nashik) : गोरगरिबांच्या मदतीला धावून येणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स सेवेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा भांडाफोड 'टेंडरनामा'ने केला होता. 'टेंडरनामा'च्या बातमीची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे - फडणवीस - पवार सरकारवर मंगळवारी (ता. २३) चौफेर टीका केली.

Ambulance Scam
Nashik : 'या' जमिनींना येणार सोन्याचा भाव; नवीन एमआयडीसींसाठी होणार हजार हेक्टरचे भूसंपादन

गरीब रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या सरकारी अॅम्ब्युलन्स सेवेच्या टेंडरमध्ये तुम्ही पैसे खाण्याइतके निर्लज्ज आहात, अशा शब्दांत उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसूख घेतले.

Ambulance Scam
Nashik : ZP CEO अशिमा मित्तल यांचा नागरिकांनी का केला सत्कार? कारण आहे खास!

राऊतांच्या आरोपांच्या फैरी...

आठ हजार कोटीचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा करण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला. आरोग्य विभागाचाच नव्हे, तर राज्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. घोटाळेबाज व्यक्ती सरकारमध्ये बसले आहेत. मात्र त्याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. हा पैसा नेमका महाराष्ट्रात जातो की दिल्लीत जातो की गुजरातला जातो? आमदार आमच्यापासून तोडले त्या आमदारांना हा पैसा वाटला की विधानसभाध्यक्ष नार्वेकरांना आमच्याविरोधात निकाल देण्यासाठी हा पैसा देण्यात आला, असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

Ambulance Scam
Mumbai : पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी गुड न्यूज; 'त्या' सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 503 कोटींचे टेंडर

आठ हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा...

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून (108) वारेमाप पैसा कमविण्याची 'योजना' सरकारमधील काही मंडळींना केल्याचे समोर आले होते. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना 'बदली'ची भीती दाखवून अ‍ॅम्ब्युलन्सचे साडेतीन-चार हजार कोटीपर्यंतच्या टेंडर तब्बल 8 हजार कोटीपर्यंत फुगवल्याचेही यातून उघड-उघड दिसत आहे. सरकारमधील काही नेत्यांचे बारा महिने खिसे गरम ठेवणाऱ्या आणि परदेशवाऱ्या घडविणाऱ्या एका ठेकेदाराला हे काम देण्याचा आटापिटा अख्ख्या सरकारनेच केलेले आढळून आले.

सुमारे आठ हजार कोटी रुपयांपर्यंतच्या टेंडरसाठी 21 दिवसांचा अवधी अपेक्षित असतानाही केवळ सात दिवसांतच टेंडर उघडल्याचे समोर आले होते. परिणामी, गरीब रुग्णांच्या योजनेच्या या टेंडरमध्ये 8-10 हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याची भीती आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com