Ajit Pawar : पुणेकरांना एप्रिल फूल करू नका! असे का म्हणाले अजितदादा?

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमुळे (Pune Airport New Terminal) पुढील पाच ते सहा वर्षे शहराची चिंता मिटली आहे. याबरोबरच पुरंदर विमानतळाचे (Purandar Airport) काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी लवकरच भूसंपादनाचे काम सुरू होईल. हे विमानतळ झाल्यावर पुण्याचा जीडीपी (Pune GDP) दोन टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात व्यक्त केला.

Pune
Sambhajinagar : 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'तो' रस्ता होणार वाहतुकीसाठी मोकळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवारी (ता. १०) नवीन टर्मिनलचे उद्‍घाटन केले. टर्मिनलच्या आवारात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, उमा खापरे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘पुण्यासाठी नवीन विमानतळ पुरंदरलाच होणार आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, शिवाय कार्गो टर्मिनलचीही सुविधा असेल. त्याता उत्पादकांनाही फायदा होईल. भूसंपादन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून, येत्या पाच ते सहा वर्षांत पुरंदरला विमानतळ तयार होईल.’’

Pune
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत वर्षभरात दहा हजार किलोमीटरचे रस्ते

एप्रिल फूल ठरू नये : पवार

नवीन टर्मिनलचे उद्‍घाटन जरी झाले असले, तरीही प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे. एक एप्रिलला टर्मिनल सुरू करावे, अशी सूचना विमानतळ प्रशासनाला केली आहे. अद्याप काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. तेव्हा विमानतळ प्रशासनाने एक एप्रिलपासून प्रवाशांसाठी टर्मिनल खुले करावे, मात्र ते एप्रिल फूल ठरता कामा नये, असा चिमटा उपमुख्यमंत्री पवार यांनी काढला.

Pune
जालना-खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग; 4900 कोटींचा खर्च

फडणवीस म्हणाले...

- जुने टर्मिनल अपुरे असल्याने प्रवाशांची गैरसोय

- नवीन टर्मिनल पुण्याच्या संस्कृतीला साजेसे

- मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशातील विमानतळांच्या संख्येत दुपटीने वाढ

- पुणे हे महाराष्ट्राच्या उत्पादन व आयटी क्षेत्राचे हब, त्यामुळे परदेशातून येणाऱ्यांची संख्याही अधिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com