Aditya Thackeray : सत्तेत येताच 4 हजार कोटींचा 'तो' प्रकल्प पुन्हा राबविणार

Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी यापुढे पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प हाच चांगला पर्याय आहे, असे मत आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आताच्या राज्य सरकारने रद्द केलेला हा प्रकल्प आमचे सरकार आले की आम्ही पुन्हा आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray
Mumbai MHADA : दक्षिण मुंबईतील तब्बल 39 एकरवरील 'त्या' समूह पुर्नविकास प्रकल्पाचे भवितव्य अंधारात, कारण काय?

मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करून मागणी आणि पुरवठा यामधील तूट कमी करण्याकरिता विश्वासार्ह आणि हवामान बदल संवेदनक्षम स्त्रोत विकसित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मनोरी येथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

४००० कोटींच्या या प्रकल्पासाठी यापूर्वी केवळ दोनच कंपन्यांनी टेंडर भरले होते. हा प्रकल्प आयडीई (IDE) कंपनीलाच मिळावा यासाठी महापालिकेचा खटाटोप सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत यांनी तेव्हा केला होता. काँग्रेसच्या आरोपानंतर महापालिकेने आधीचे टेंडर रद्द करीत नव्याने टेंडर प्रसिद्ध केले होते.

Aditya Thackeray
Karad : 8 दिवसांत काम पूर्ण करा अन्यथा ठेकेदारावर कठोर कारवाई; कोणी दिला इशारा?

'मुंबई फर्स्ट' या संस्थेतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'पोलिटिकल टाऊन हॉल'अंतर्गत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चगेटच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी त्यांनी मुंबईच्या पाणीपुरवठ्याविषयी भाष्य केले.

ते पुढे म्हणाले की, मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प आमच्या सरकारच्या काळात हाती घेतला होता. मात्र आताच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला.

अनेक मोठ्या देशांमध्ये नि:क्षारीकरण प्रकल्पातूनच पाणी मिळवले जाते. त्यामुळे नि:क्षारीकरण प्रकल्प हा चांगला पर्याय आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रकल्प पुन्हा मार्गी लावू, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Aditya Thackeray
10 लाख कोटींचे प्रकल्प राज्याबाहेर गेले; महाराष्ट्रातील 10 लाख रोजगार हिरावले

गारगाई धरण प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेने हा प्रकल्प बाजूला ठेवून नि:क्षारीकरण प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते.

मालाड मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारून त्यातून २०० ते ४०० दशलक्ष लीटर पाणी मिळवणे शक्य होणार आहे. मात्र सत्तापालट झाल्यानंतर गारगाई धरण प्रकल्पाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती. तर नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीही मुंबई महापालिकेने वर्षभरात टेंडर प्रक्रिया राबवली होती. मात्र प्रतिसाद न आल्यामुळे हे टेंडर रद्द करण्यात आले.

या प्रकल्पाचे रिटेंडर काढण्यात येणार होते. मात्र आचारसंहितेमुळे हा विषय मागे पडला.

Aditya Thackeray
Pune : 35 कोटी मंजूर; मग 'त्या' प्रकल्पाच्या कामाचे टेंडर कधी निघणार?

गारगाई धरण प्रकल्प पूर्ण करणे अशक्य असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा आपण दहा वर्षांचे होतो तेव्हापासून ऐकत आलो आहोत, असेही ते म्हणाले. या धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अनेक परवानग्या लागणार आहेत व त्याकरीता खूप वर्ष लागणार आहेत.

तसेच या प्रकल्पासाठी पाच लाख झाडे कापावी लागणार असून तानसा अभयारण्यही बाधित होणार आहे. त्यानंतर हे धरण बांधायला काही वर्षे लागतील. तसेच जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यासाठी मोठा कालावधी आणि कोट्यवधी रुपये लागतील. एवढे करून दरदिवशी केवळ ४०० दशलक्ष लीटर पाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्यवहार्यही नसल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com