मुंबई : रस्त्यांच्या ५८०० कोटींच्या टेंडरसाठी २५ कंपन्यांत स्पर्धा

Mumbai
MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) शहरातील सीसी रस्त्यांसाठी काढलेल्या ५ हजार ८०० कोटींच्या रस्त्यांच्या टेंडरसाठी देशातील २५ बलाढ्य कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टेंडर पूर्व बैठक बुधवारी पार पडली.

Mumbai
डबल डेकर ई-बसमधून करा जीवाची मुंबई; 'या' कंपनीला 200 गाड्यांचे...

मुंबई महापालिकेने शहरातील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ५ हजार ८०० कोटींची पाच टेंडर प्रसिद्ध केली आहेत. पश्चिम उपनगरांमधील २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटींचे सर्वाधिक टेंडर आहे. त्यापाठोपाठ मुंबईतील ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी आणि पूर्व उपनगरातील ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटींचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने बांधले जाणार असून, त्यामुळे दोन वर्षांत संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा महापालिकेचा आहे.

Mumbai
साडेतीन किमीच्या भूमिगत मार्गासाठी नेमणार सल्लागार; MMRDAचे टेंडर

राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या मोठ्या कंपन्यांकडून टेंडरला प्रतिसाद मिळेल अशी महापालिकेला अपेक्षा होती. त्यानुसार बुधवारी पार पडलेल्या टेंडर पूर्व बैठकीत बलाढ्य कंपन्यांनी सहभाग घेतला असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने लार्सन एण्ड टुब्रो यासारख्या बलाढ्य कंपन्यांच्या सहभागाची माहिती आहे. मुंबईतील सीसी रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घ्यावा यासाठी महापालिकेने मोठ्या रस्त्यांची टेंडर प्रक्रिया राबवली आहे.

Mumbai
अखेर औरंगाबाद खंडपीठासमोर नमले प्रशासनातील दुशासन; मोठा अडथळा दूर

मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यानंतर सुमारे ४०० किलोमीटरच्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पूर्व उपनगरातील ७५ किमीचे रस्ते, पश्चिम उपनगरातील २७५ किमीचे रस्ते आणि मुंबई शहरातील ५० किमीच्या रस्त्यांचा समावेश आहे. वर्ष २०२३ - २४ मध्ये एकूण ४२३ किमीच्या रस्त्याचे काम हात घेण्याचे उद्धिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये एकुण ४०० किमीचे रस्ते विकसित करण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. त्याअनुषंगाने ५० किमीच्या रस्त्यासाठी ८०० कोटींचे रस्ते तयार करण्यात येतील. पूर्व उपनगरात ७५ किमीचे ६०० कोटीचे रस्ते आणि पश्चिम उपनगरात २७५ किमीचे ३५०० कोटी रूपयांचे रस्ते विकसित करण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ते बांधणी केली जात आहे. आतापर्यंत ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. चालू वर्षात २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होत आहे. त्यावर २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. सध्या ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम या वर्षी प्रस्तावित आहे. तर उर्वरित ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी हाती घेतली जातील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com