पुण्यात २०० कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघड

Warje Police Station

Warje Police Station

Tendernama

Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागातील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये सुमारे 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प गैरव्यवहार (Housing Project Scam) झाल्याचे समोर आले आहे. संबंधित सोसायटीचा चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी संस्थेच्या मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला असून, त्यानंतर गैरव्यवहाराची ही मोठी घटना उघडकीस आली आहे.

Warje Police Station

बंधूप्रेम भोवले; कंत्राटही गेले अन् सरपंचपदही गेले

या प्रकरणी रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचा चेअरमन अंबादास गाटे आणि सेक्रेटरी गणेश बजरंग माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथे रामनगर सहकारी सोसायटी उभी केली जाणार होती. या सोसायटीसाठी 218 मूळ सभासदांनी नावे नोंदविली होती. या सभासदांना सरकारकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देतो, असे अश्वासन आरोपींनी दिले होते.

Warje Police Station

न भूतो न भविष्यती! 'या' प्रकल्पाच्या खर्चात विक्रमी 400 टक्के वाढ

दीपक वेताळ आणि अन्य सभासदांकडून 1990 पासून आज पर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे रोख रकमा स्वीकारल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर सरकारकडून एक हेक्‍टर 76 गुंठे जमीन देखील प्राप्त करून घेतली. या जागेवर 396 सदनिकांचा मोठा गृह प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे बांधकाम झाल्यानंतर त्यामधील सदनिका मूळ सभासदांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी इतर लोकांना विकल्या.

Warje Police Station

फडणवीसांच्या सहकाऱ्याला महाविकास आघाडीचा 'शॉक'; दरेकरांनंतर...

या प्रकरणी सरकार आणि न्यायालयाला वेळोवेळी खोटी माहिती सादर करण्यात आली. त्यामुळे सोसायटीचे मूळ सभासद आणि सरकारची अंदाजे 200 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यावरून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्याते आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com