नागपुरात तडे गेलेल्या अंबाझरी तलावासाठी २० कोटी

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला तडे गेल्याचे समोर आले असल्याने दुरुस्तीसाठी एकूण २० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी ५ कोटी रुपये सिंचन विभागाला देण्यात आले आहे. असे असतानाही सिंचन विभागाने किती तडे बुजवले याबाबत महापालिका प्रशासनच साशंक आहे.

Nagpur
शिंदे सरकार 'या' योजनेतील रस्त्यांची चौकशी करणार का?

नागपूर शहराच्या पश्चिमेला उंच भागावर अंबाझरी तलाव बांधण्यात आला आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या तलावातून नागपूरकरांची तहाण भागविल्या जात होती. हा तलाव फुटलल्यास अर्धे नागपूर बुडू शकते असा धोका वर्तविला जात आहे. मेट्रे रेल्वेने याच तलावाच्या दर्शनी भागातून रेल्वे लाईन टाकली आहे. मेट्रो लाईन उभारण्यासाठी तलावाच्या पायथ्याशी पिलर टाकले आहे. पिलरच्या खोदकामामुळे अंबाझरी तलावाच्या भितींला तडे गेल्याच्या तक्रारी आहेत. तलावाच्या सभोवताल मोठमोठी वृक्ष आहेत. या वृक्षांच्या मुळांनी तलावाच्या भिंतीना चांगलेच जखडून ठेवले होते. पिलरच्या खोदकामामुळे मुळांचा पाश सैल झाला आहे. काही आमदारांची याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. तलाव फुटण्याचा धोकाही वर्तविला होता. झाडांच्या मुळांनी तलावाच्या सुरक्षा भिंतीला तडे गेल्याचेही बोलले जात आहे.

Nagpur
नागपूर महापालिकेचे ठेकेदार 'का' वैतागले! थेट काम बंदचा इशारा

किती झाडांची मूळांमुळे सुरक्षा भितीला धोका आहे आणि कोणती झाडे तोडावी लागतील, याबाबत सिंचन विभागाला अहवाल मागितला होती. त्यांनी सुस्पष्ट अहवाल दिला नाही. तलावाच्या दुरुस्तीसाठी २० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील ५ कोटी रुपये सिंचन विभागाला देण्यात आले. त्यातून कोणती कामे झाले, याबाबतची माहिती घेण्यासाठी लवकर सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com