CoalTheft: 150 कोटीचा कोळसा घोटाळा; नागपूरचा 'तो' मास्टरमाईंड कोण?

Yavatmal महिन्याला अंदाजे ६० हजार टन कोळशाची कर चुकवून वाहतूक
coal
coal Tendernama
Published on

नागपूर (Nagpur) : यवतमाळ (Yavatmal) तालुक्यातील वणी येथे पकडलेल्या ट्रकमधून एक कंपनी महिन्याला अंदाजे ६० हजार टन कोळशाची (Coal) कोणताही कर न भरता चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या चोरीच्या व्यवसायात काही नागपूरचे व्यापारी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते असल्याचे समजते.

coal
Davos : महाराष्ट्र उद्योजकांच्या पसंतीस; 1 लाख 37000 कोटींचे करार

कोळशाच्या चोरीचा हा प्रकार गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरू असल्याने १०० ते १५० कोटींपेक्षा अधिकच्या शासनाच्या महसुलाची चोरी केलेली आहे. नियमानुसार ७० टक्के उद्योगासाठी आणि ३० टक्के कोळसा इतरत्र विक्री करण्याची मुभा खाण संचालकांना असते. त्या नियमांची पायमल्ली करीत बीएस स्टीलचे संचालक ९० टक्के माल बाजारात विक्री करीत असल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती आहे.

ही संपूर्ण कोळशाच्या कर चोरीचा मास्टर माईंड नागपूरचा व्यापारी असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने वणी पोलिसांनी नागपुरात शोध मोहीम सुरू केलेली आहे. काही व्यापाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

coal
ZP CEO Ashima Mittal यांचा आदेश; 8 लाखांचा 'तो' वाढीव निधी रद्द

वणीच्या मुकुटबन रस्त्यावरील पेटूर गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या पथकाने कोळशाने भरलेले आठ ट्रक सहा दिवसापूर्वी पकडले होते. खाणीतून अवैधरीत्या कोळसा काढला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ट्रक चालकाकडे कोणतेही ट्रान्झिट पास आणि कागदपत्रे नव्हती. काही ट्रक नागपूरचे तर काही चंद्रपूरचे होते.

coal
Aurangabad : मध्यान्ह भोजन टेंडरमध्ये अधिकाऱ्यांची 'खिचडी'

पोलिसांनी तपासासाठी ट्रक ताब्यात घेतला. त्याची किंमत २.४२ कोटी रुपये आहे. यासोबतच ट्रकमालक आणि कोळसा व्यापाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, कोणीही वैध कागदपत्रे देऊ शकलेले नाही. दरम्यान, वणी पोलिसांनी नागपुरातील व्यापाऱ्यांचा शोध घेतला. अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाला नोटीस बजावण्यात आली आहे. हा कोळसा घोटाळा १०० ते १५० कोटीचा असल्याची माहिती आहे.

coal
Nagpur होऊ दे खर्च; सरकार आहे घरचं! नुतनीकरणावर 11 कोटींचा चुराडा

यासोबतच बीएस स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कोळशासह आठ ट्रक गेल्या सहा दिवसांपासून पोलिस ठाण्यात अडवले असताना एकाही व्यापाऱ्याकडून परतीची मागणी न झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com