World Class News: नागपुरातील 'हे' रेल्वे स्टेशन पाहून थक्क व्हाल!

Ajni Railway Station
Ajni Railway StationTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्टेशन (Ajni Railway Station) आता वर्ल्ड क्लास स्टेशनच्या सूचित सामिल होणार आहे.

Ajni Railway Station
Nashik : अंजनेरी-ब्रह्मगिरी दरम्यान होणार 376 कोटींचा रोपवे

359 कोटी खर्चून त्याचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. त्यासाठी माती परीक्षण करून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात अजनी स्टेशन शहरवासीयांसाठी महत्त्वाचे स्टेशन म्हणून उदयास येणार आहे. जागतिक दर्जाचे स्टेशन होण्याबरोबरच येथे सुविधाही वाढणार आहेत. येथे 4320 चौरस मीटरचा रूफ प्लाझा बांधण्यात येणार असून, त्यामध्ये वेटिंग लाउंज, कॅफेटेरिया, रिटेल अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

अजनीत सध्या 3 प्लॅटफॉर्म आहेत...

नागपूर शहरात सध्या तीन स्थानके आहेत, ज्यात नागपूर, अजनी आणि इतवारी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत अत्याधुनिक सुविधा असलेले नागपूर हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे. येथे वाहनांची संख्या ओव्हरलोडच्या स्थितीत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन आणि प्रवासी दोघांनाही चिंता करावी लागत आहे.

Ajni Railway Station
Nashik: दुमजली उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालात आता मोठा बदल

अजनी हे जागतिक दर्जाचे स्टेशन बनल्याने नागपूर स्टेशनचा भार कमी होणार आहे. अजनी रेल्वे स्टेशन संकुलात रेल्वेची बरीच जमीन असल्याने येथील स्टेशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 359.82 कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जाणार आहे. सध्या त्याचे फक्त 3 प्लॅटफॉर्म आहेत.

काही गाड्यांना केवळ स्टॉपेज देण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना नागपूर स्टेशनवरच अवलंबून राहावे लागत आहे. आता अजनी स्टेशनचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर दुरंतो एक्स्प्रेस सारख्या अनेक महत्त्वाच्या गाड्या येथून धावू शकणार आहेत.

माती चाचणी पूर्ण...

संपूर्ण स्टेशनचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नुकतेच माती परीक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यानंतर अजनी स्टेशनच्या इमारतीच्या पूर्वेकडील जागा रिकामी करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे.

Ajni Railway Station
Nashik DPC : पालकमंत्री भुसेंविरोधात भुजबळांचे शड्डू, कारण...

असा होणार विकास...

अजनी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकास आराखड्यानुसार स्थानकाच्या दोन्ही बाजूला इमारती असतील. स्टेशनवर 4320 चौरस मीटर रुफ प्लाझा विकसित केला जाईल, जो वेटिंग लाउंज, कॅफेटेरिया, रिटेल यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.

यासोबतच येण्या-जाण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल. पुनर्विकसित स्थानक इमारतीत प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानक इमारतीत 21 लिफ्ट, 17 एस्केलेटर आणि 6 ट्रेवलेटर यांची व्यवस्था असेल. संपूर्ण स्थानक अपंगांसाठी अनुकूल असेल आणि बहुस्तरीय पार्किंगची सुविधाही असेल.

सीटी बसेसची मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी

मेट्रो स्टेशन, शहर बस आणि वाहतुकीच्या इतर पद्धतींसह स्टेशनची मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी असेल, ज्यामुळे स्टेशनवरील प्रवाशांची हालचाल अधिक सोयीस्कर होईल. सौरऊर्जा, जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याची साठवण या सुविधांसह स्टेशनचा ग्रीन बिल्डिंग म्हणून पुनर्विकास केला जाईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com