अंबाझरीतील अम्युझमेंट पार्कच्या कामावर कोणी घातली तात्पुरती बंदी?

 Ambazari Park
Ambazari ParkTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : अंबाझरी कॅम्पसमधील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याच्या विरोधात, यासह विविध मागण्यांसाठी 151 दिवसांपासून महिलांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 26 जून रोजी 'देवगिरी' येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अधिकृत कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चात 50 हजारांहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) गरुड अम्युझमेंट पार्क (नागपूर) प्रा. लि. कंपनीला पत्र देऊन अंबाझरी कॅम्पसमधील मनोरंजन उद्यानासाठी सुरू असलेली विकासकामे तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पत्रात विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालाचा दाखला देत पुढील आदेश येईपर्यंत कामे थांबविण्यास सांगण्यात आले आहे.

 Ambazari Park
Devendra Fadnavis: देशाला जमले नाही ते महाराष्ट्राने करून दाखविले!

आंदोलन सुरू राहील

आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) संकुल बचाव समितीने म्हटले आहे की, या निर्णयाबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही. सरकारने त्यांना याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. हा MDTC आणि गरुडा कंपनी यांच्यातील पत्रव्यवहार आहे. आमच्याकडे अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही, असे समितीचे मुख्य निमंत्रक किशोर गजभिये यांनी सांगितले.

याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, परंतु जे ऐकले आहे त्यानुसार तो तात्पुरत्या बंदींचा आदेश आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आमच्या तीन प्रमुख मागण्या आजही कायम आहेत. यामध्ये पहिला गरुड कंपनीसोबतचा करार रद्द करणे, दुसरा, ज्या 20 एकर जागेत इमारत पाडण्यात आली त्या जागेत केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे बांधकाम करणे आणि तिसरे म्हणजे एफआयआर दाखल होऊनही आरोपींनी अद्याप अटक नाही, त्यांना तात्काळ अटक करणे, असे गजभिये यांनी सांगितले.

 Ambazari Park
Pune: पालिकेचा दावा खरा की खोटा? नगर रोड अतिक्रमणमुक्त झालाय का?

वारंवार न्यायालयात जाणे

आमचे आक्षेप खरे असल्याचे न्यायालयानेही तीन वेळा मान्य केले आहे. तसेच त्याच आधारावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते आहे. त्यामुळे येत्या 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्हेरायटी चौक ते देवगिरी असा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे 50 हजार लोक सहभागी होतील, असे ते म्हणाले.

भावनांचा आदर करा

अंबाझरीतील काम तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याच्या आदेशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतानाच धरमपाल मेश्राम म्हणाले की, हा निर्णय आंबेडकरी समाजाच्या भावनेचा आदर करणारा आहे. त्यांनी आंदोलक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com