विदर्भातील कोळशाने कर्नाटक, गुजरात,मध्यप्रदेशातील वीजपुरवठा अखंडीत

Coal Mines
Coal MinesTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : विदर्भातील खाणीतून कोळसा उत्पादन युद्ध पातळीवर सुरू असून दरररोज रेल्वे मालगाडीतून १ लाख २४ हजार टन कोळशाची वाहतूक केली जात आहे. हा कोळसा महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यातही पाठविण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील कोळशाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या तीन राज्यातील वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी विदर्भाचा वाटा आहे हे विशेष.

Coal Mines
महाविकास आघाडीचे कोळशाने हात काळे? ६ हजारांचा कोळसा १६ हजारांना...

ऐन उन्हाळ्यात कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने अनेक राज्यांना वीज कपातीला समोरे जावे लागत आहे. विदर्भात विविध ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. येथून कोळसा उत्पादन युद्ध पातळीवर सुरू आहे. विदर्भासह राज्यातील विद्युत केंद्रात रेल्वे मालगाडीने कोळशाचा पुरवठा केला जात आहे. साधारण दरदिवशी विदर्भातील कोळसा २८ मालगाड्यांनी विद्युत केंद्रात जात होता. मात्र, उन्हाळ्यात परिस्थिती बदलली. यात आता आणखी तीन फेऱ्या वाढवून ३१ फेऱ्या झाल्या आहेत. दरदिवशी ३१ फेऱ्यांनी कोळसा विद्युत केंद्रात पोहोचविला जात आहे. एका माल गाडीत साधारणतः ४ हजार टन कोळशाची वाहतूक होते. पूर्वी दरदिवशी मालगाडीतून १ लाख १२ हजार टन कोळसा विद्युत केंद्राला पुरविला जात होता. आता त्यात वाढ होऊन ३१ फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे विद्युत केंद्राला १ लाख २४ हजार टन कोळशाचा पुरवठा सध्या रोज होत आहे. त्यामुळे विदर्भातील खाणीतून कोळशाचे उत्पादन सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

Coal Mines
५ हजार कोटींचे 'ते' टेंडर टाटा मोटर्सकडे; २५ हजार रोजगाराच्या संधी

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने देशात वीज टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांना वीज कपातीला समोर जावे लागत आहे. राज्यात सुद्धा काही दिवसापूर्वी भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारनियमनाला कोळशाची हे सुद्धा एक कारण होते. मात्र, राज्यात सध्या भारनियमनाची स्थिती नाही.

विदर्भातील या खाणीतून सुरू आहे कोळसा उत्पादन
चंद्रपूर, बल्लारशा, बाबूपेठ, माजरी, घुग्घुस, वणी, जुनारदेव, उमरेड हे मुख्यतः कोळशाचे उत्पादन केंद्र असून येथून कोळसा लोडिंग केला जातो.

Coal Mines
ठाकरे सरकार अन् कोळशासाठी चक्क इंडोनेशियाचा ठेकेदार! का?

येथे केला जात आहे पुरवठा
एमपी बीजी सारणी (मध्यप्रदेश) कर्नाटक, गुजरात या तीन राज्यांसह नाशिक, भुसावळ, पारस (अकोला), खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर, तळाले (चंद्रपूर), जीएमआर पावर हाऊस वरोरा (चंद्रपूर), पीएमईसी वरोरा (चंद्रपूर) येथील विद्युत केंद्रात विदर्भातील कोळशाचा पुरवठा रेल्वे मालगाडीतून केला जात आहे.

पूर्वी दर दिवशी २८ रेल्वेच्या मालगाड्यांनी विद्युत केंद्रात विदर्भातील कोळसा जात होता. आता त्यात वाढ झाली आहे. दरदिवशी ३१ फेऱ्या मालगाड्यांच्या होत असून एका माल गाडीत ४ हजार टन कोळसा वाहून नेला जात आहे.
- विजय थूल (मंडळ वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com