नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अडचणी वाढल्या; विनाटेंडर कामे..

RTMNU Nagpur
RTMNU NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठातील काही विकास कामे टेंडर कार्यवाही न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा अहवाल अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी दिला आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

RTMNU Nagpur
सरकार झाले 'ट्रिपल इंजिन' अन् आमदार मजेत पण ठेकेदार बुडाले कर्जात

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने डॉ. चौधरी यांना दोषी ठरवले होते. परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (एमकेसीएल) निवड आणि विनानिविदा बांधकांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. यासोबतच विद्यापीठाच्या वतीने विविध विकास कामे करण्यात आली. हे करताना कंत्राट न काढता एकाच व्यक्तिला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. आता यावरही समितीने अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे.

RTMNU Nagpur
BMC: विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेत घोळ नाही; आयुक्तांकडून स्पष्ट

एकाच कंत्राटदारास दुसऱ्या इमारतीमधील काम विनानिविदा देण्यात आलेले आहेत. सदर वित्तीय अनियमिततेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून अधिकची चौकशी होऊन संबंधीताविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी आपला अहवाल सादर केला असून यानुसार सदरहू कामे टेंडर कार्यवाही न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा शेरा दिला आहे. त्यामुळे कुलगुरू चौधरींच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलगुरू डॉ. चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

RTMNU Nagpur
Nagpur: क्रीडा संकुलावर अनधिकृत कब्जा; कंत्राटदाराविरोधात तक्रार

विद्यापीठाकडून माहिती देण्यास विलंब :

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी चौकशी करताना विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाशी अनेकदा संपर्क केला. तसेच त्यांना यासंदर्भातील माहिती मागितली. मात्र, ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे सदर अहवाल तयार करण्यास विलंब होत असल्याचे ताशेरेही ओढण्यात आले आहे. शेवटी अनेक पत्रव्यवहारानंतर विद्यापीठाने 5 जून 2023 ला अधिक्षक अभियंत्यांना पत्र दिले. त्यामध्ये विद्यापीठाची सदरहू कामे ‘रूसा’ योजनेअंतर्गत विद्यापीठाला मिळाली होती. सदरहू कामे 31 मार्च 2022 आधी पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामुळे ती करण्यात आली असे कळवण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com