नागपूर (Nagpur) : भारतीय रेल्वे आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे, ज्या अंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नागपूर रेल्वे स्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येत आहे. हा पुनर्विकास एकूण 487.77 कोटी रुपये खर्चून केला जाणार आहे. आधीच उभारलेल्या हेरिटेज इमारतीचे स्वरूप कायम ठेवत स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम करण्यात येणार आहे.
स्टेशन असणार सर्व सोयीसुविधायुक्त :
पुनर्विकसित स्टेशन सर्व अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असेल. यात मोठा छताचा प्लाझा असेल, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीसाठी 28 लिफ्ट आणि 31 एस्केलेटरची व्यवस्था असेल. आणि याशिवाय बेसमेंट पार्किंग, वेटिंग एरिया, सीसीटीव्हीची सुविधा तसेच संपूर्ण स्टेशन अपंगांसाठी अनुकूल करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक, शहर बस आणि वाहतुकीच्या इतर साधनांपर्यंत कनेक्टिव्हिटी विकसित केली जाईल.
पुनर्विकसित स्टेशनची रचना ग्रीन बिल्डिंग म्हणून केली जाईल आणि त्यात सौर ऊर्जा, जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण्याची सुविधा असेल. सध्या, बॅचिंग प्लांटची स्थापना, साइट लॅबचे बांधकाम, विद्यमान दुधाचे साइडिंग प्रस्तावित नवीन ठिकाणी स्थलांतरित करणे आणि वजन पूल कार्यान्वित करणे ही कामे पूर्ण झाली आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे प्रवाशांना केवळ जागतिक सुविधा उपलब्ध होणार नाहीत, तर स्थानक परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
प्रवाशांना मिळणार अनेक सुविधा:
ट्रेनमधून उतरताच प्रवाशी मेट्रो, सिटी बस किंवा इतर खासगी गड्यांनी प्रवास करू शकतात. मेट्रो, सिटी बस व इतर वाहानांसाठी रेलवे मंत्रालयाकडून कनेक्टिविटी केली जाणार आहे. सर्वसुविधायुक्त असणाऱ्या वर्ल्ड क्लास स्टेशन चे अनेक फायदे देखील होतील.