ॲपवर फोटो टाका अन् 72 तासांत रस्ता होणार खड्डेमुक्त

potholes
potholesTendernama
Published on

अकोट (Akot) : सतत कामकाजावर आक्षेप असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेत रस्त्याच्या कामकाजासंदर्भात जनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे आता रस्त्यावर खड्डा दिसला की लगेच फोटो काढा आणि संबधित ऍपवर पाठवा, जेणेकरून खड्ड्यांची त्वरित दखल घेत काम केले जाईल, जेणेकरून अपघात टळतील.

potholes
Amravati: सुकळी, अकोलीत मनपा करणार बगिचा आणि क्रीडांगणाची निर्मिती

सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिमा उंचावणारी ही योजना असली तरी मात्र कामाचा दर्जा टिकवून राहण्यासाठी कंत्राटदारालाही सजग राहावे लागणार आहे. अन्यथा कारवाईची टांगती तलवार असणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस अँप सुरू केले. नागरिकांत जनजागृती, खात्याची प्रतिमा उंचवावी व चांगल्या अधिकाऱ्यांची मनोधैर्य वाढावे, या माध्यमातून राज्याला खड्डेमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ते अशी संभ्रम करणारी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. या खड्याबाबत सामान्य नागरिक सजग असतो त्यामुळे खड्डे मुक्तीसाठी जनजागृती व्हावी, यासाठी असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी व्हायला हवा. नागरिकांनी 'पीसीआरएस' हे ऍप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागणार असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची करून रस्ते बांधकाम करण्यात येते.

potholes
Bhandara : जिल्ह्यातील एकमेव जलतरण तलाव 4 वर्षांपासून बंद, कारण...

राज्य सरकारचे पीसीआरएस ॲप

'पॉटहोल कंम्प्लेंट रिड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस) या ॲपव्दारे मोबाइलवरुन तक्रारी करता येणार आहे. हे शासनाचे ॲप असून, या ॲपच्या प्रत्येक हालचालीवर यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

ॲप कसे डाऊनलोड कराल? हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावरील सूचना, तक्रारीवर कार्यवाहीची सूचना संबंधित विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला दिली जाईल. खड्डे दुरुस्तीनंतर संबंधित तक्रारदारास संदेशही जाईल.

potholes
Mumbai-Pune Express Way : 10 वर्षांसाठी CCTV वर 340 कोटींचा खर्च

सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार 72 तासांत दखल

या फोटोवरून रस्त्यावर पडलेला खड्डा 72 तासांच्या आत भरण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधका मंत्रालयाने दिल्या आहेत. फोटोवरून खड्डे त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या. तरी मात्र खड्डे पडतात, ते खड्डे त्वरित बुजविण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होतो. परंतु, या ॲपपचा नागरिक किती प्रमाणात फायदा घेतात आणि संबंधित विभाग किती तत्परतेने दखल घेईल, यावरच शासनाचे खड्डेमुक्त योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

सरकारने ॲप प्रणाली तयार करून नागरिकांना आश्वासक तर केले आहे. फोटो अपलोड केल्यानंतर रस्त्यावरील खड्डे त्वरित भरले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी व्हायला हवा.

- नरेंद्र पुरोहित, नागरिक, अकोट

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com