लोकप्रतिनिधीच्या भागीदारी असलेल्या रस्त्याला अवकळा

लोकप्रतिनिधीच्या भागीदारी असलेल्या रस्त्याला अवकळा
Published on

मेहकर (Mehkar) : शहरातील बसस्थानक ते हरणटेकडी हा सिमेंटरस्ता केवळ सहा महिन्यातच खराब झाला असून खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तर सिमेंटच्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहे. विशेष म्हणजे या कामात लोकप्रतिनिधींची काही प्रमाणात भागीदारी असल्याची चर्चा दबक्या आवाज ऐकविण्यास मिळत असल्यामुळे कोणीही याबाबत तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही.

लोकप्रतिनिधीच्या भागीदारी असलेल्या रस्त्याला अवकळा
पीएमआरडीचा मोठा निर्णय; 'या' १७ राखीव भूखंडासाठी मागविले टेंडर

मेहकर बसस्थानक चौक ते हरणटेकडी व पुढे अंत्री देशमुख या 5 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले. बसस्थानक चौक ते शाम किराणा पर्यंतचा रस्ता सिमेंटचा करण्यात आला. परंतु, त्याचा दर्जा खराब असल्याने कमी कालावधीतच त्याची दुर्दशा झाली आहे. पुढे हरणटेकडी ते अंत्री देशमुख पर्यंत डांबरी रस्ता करण्यात आला आहे. हा डांबरी रस्ताही तितका चांगल्या दर्जाचा करण्यात न आल्याने रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले व ते नंतर बुजविण्यात आले.

लोकप्रतिनिधीच्या भागीदारी असलेल्या रस्त्याला अवकळा
60 कोटींचे टेंडर आर्थिक तडजोडीने मंजूर; ऐनवेळी भाजपचा 'यु टर्न'

वास्तविक पाहता बसस्थानक चौक ते हरणटेकडी मार्गावर महाविद्यालय, विद्यालय, संगणक शिकवणी संस्था, ग्रामीण रुग्णालय, स्वामी समर्थ केंद्र, पेनटाकळी प्रकल्प कार्यालय व रहिवासी कॉलनी, हरणटेकडी संस्थान इत्यादी महत्वाची ठिकाणे असून या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते .खराब सिमेंट रस्त्यामुळे असुविधा झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सिमेंट वाळू निघून जात आहे. रस्त्यावरच्या वाहनांच्या वर्दळीमुळे सिमेंटची धूळ वडरवाडा भागातील घरांमध्ये जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. धूळ उडू नये म्हणून नागरिक दिवसातून अनेकदा रस्त्यावर पाणी टाकत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकाम करणे गरजेचे असताना केवळ एकाच बाजूने अर्धवट नाली बांधकाम करण्यात आले आहे. बहुतांश नाली बांधकाम करण्यातच आलेले नाही. याचा पावसाळ्यात मोठा त्रास होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com