नागपूर (Nagpur) : ५० कोटी बाजारमूल्य असताना २५ कोटी ६१ लाख दर्शवून नागनदीच्या संरक्षण भिंतीवर उभारण्यात आलेल्या जगनाडे चौकातील ट्रान्सपोर्ट प्लाझाला संरक्षण कोण देत आहे असाल उपस्थित केला जात आहे.
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने हा प्लाझा उभारला आहे. त्याने बंड पुकारून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. असे असले तरी दोन्ही सरकारने या प्लाझाला हात लावलेला नाही. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदार संघात हा प्लाझा उभा भाहे. ते मात्र सातत्याने या विरोधात आवाजत उठवत आहे. अधिवेशनातही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासला त्यांनी वारंवार तक्रारी दिल्या आहेत.
भाजपचा पदाधिकारी नागपूर सुधार प्रन्यासचा विश्वस्त असताना या प्लाझासाठी टेंडर काढण्यात आले होते. त्याने शहरातील एक वादग्रस्त ठेकेदाराकडे काम सोपवले. दोघांनी मिळून आलिशान प्लाजा उभारला. ट्रांसपोर्ट प्लाझाच्या नावाखाली त्याच कमर्शियलच अधिक पवार करण्यात आले. येथे हॉटेल, क्लब, मॅरेज हॉलची व्यवस्था करण्यात आली. मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. दर्शनी भागाचा पुरेपूर व्यावसायिक वापर करण्यात आला. त्याकरिता प्लाझाचा नकाशाच बदलवण्यात आला. मोठ्या बसेसच्या पार्किंग हा मुख्य उद्देश प्लाझाचा होता. तो दुय्यम करण्यात आला. प्लाझाच्या मागच्या बाजूला ट्रासंपोर्ट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. प्लाझासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ९३०० चौरस मीटर जागा ट्रांसपोर्टसाठी आरक्षित होती. मात्र कोणाचाही परवानगी न घेता मॉल उभारण्यात आला. ही जागा लिलावाद्वारे विकली असती तर ५० कोटी रुपये सुधार प्रन्यासला मिळाले असते. मात्र त्याचे बाजारमूल्य २५ कोटी ६१ लाख दर्शवण्यात आले. नागनदीपासून १५ मीटर सोडून बांधकाम करावे, अशा प्रकारचा नियम असताना नागनदीच्या सुरक्षा भिंतीवर पिलर उभारण्यात आले आहेत.