नागपुरातील 'त्या' बोगस ठेकेदारांना पोलिसांचा दणका; आयकर विभागाकडून

Mid Day Meal
Mid Day MealTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील (Nagpur City) शाळांना पोषण आहाराच्या (Mid Day Meal) पुरवठ्यासाठी बनावट कागदपत्रे देऊन टेंडर (Tender) घेणारे ठेकेदार (Contractor) आता पोलिसांच्या (Police) रडावर आले आहेत. एवढेच नव्हे तर आयकर विभागामार्फत (IT) सर्वांची चौकशी करावी, असे पत्रही पोलिसांच्यावतीने देण्यात आले आहे.

Mid Day Meal
नागपूर रेल्वे स्थानक पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; 487 कोटीचा निधी...

मागील आठवड्यात शाळांचे धान्य खुल्या बाजारात विक्री करीत असताना सुसंस्कार महिला बचत गटाच्या चंद्रशेखर भिसीकरसह इतर तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर इतरही बचत गटांच्या व्यवहाराची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण (वय २२, रा. खरबी), चंद्रशेखर प्रभाकर भिसीकर (वय ४५, रा. तांडापेठ) यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. चंद्रशेखर भिसीकरचा भाऊ अमोल भिसीकर याच्यासह चंद्रशेखरकडून धान्याची खरेदी करणाऱ्या सतीश निर्मलकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mid Day Meal
जावई असूनही त्यांनी कल्याण-डोंबिवलीला निधी दिला नाही!

दरम्यान, सारा आणि सीया ट्रेडर्सच्या माध्यमातून दरवर्षी ९ कोटींची उलाढाल केली जाते. त्यामुळे त्यांच्या उलाढालीनुसार ते आयकर नियमित भरतात काय?, याशिवाय त्यांनी सादर केलेले आयटीआर हे योग्य आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र दिले आहे. केंद्रीयकृत आहाराच्या वाटपात असलेल्या संस्थांनीही बरीच बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पोलिसांनी पत्र दिले आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Mid Day Meal
Pune: पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा

संस्थाकडून बनावट ‘आयटीआर’
पोषण आहाराचे कंत्राट मिळावे यासाठी संस्थांनी आपली उलाढाल वाढवून दाखविण्यासाठी बनावट ‘आयटीआर’ तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या संस्थांच्या तपासणीसाठी त्यांच्या बॅंकांचे विवरणही मागविण्यात येत आहे. शिवाय असे बोगस ‘आयटीआर’ देणाऱ्या ‘सीए’ही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com