Nagpur : 'या' उद्यानातील 'फूड प्लाझा'ला विरोध; जनहित याचिका दाखल

Court
CourtTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक रस्त्यावरील वीर सावरकर नगर उद्यानात फूड प्लाझा बांधण्यात येत आहे. याविरोधात संकुलातील ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. वृषाली जोशी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Court
मुंबईतील विकास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार लागले कामाला

बांधकाम थांबविण्याची विनंती :

डॉ. राजेश स्वर्णकर आणि इतर ज्येष्ठ नागरिकांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, 28 जानेवारी 1969 रोजी एनआयटी आणि महापालिकेने लेआउट मंजूर करून या सार्वजनिक वापराच्या ठिकाणी संकुलातील लोकांसाठी उद्यान विकसित केले. या वीर सावरकर नगर उद्यानात वीर सावरकर नगर, विकास नगर, देव नगर, विवेकानंद नगर व सेंट्रल एक्साईज कॉलनी येथील नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ फिरायला येतात तर लहान मुले खेळायला येतात. हे उद्यान कॅम्पसमधील लोकांसाठी चैतन्य केंद्र आहे, परंतु आता या बागेत फूड प्लाझा तयार केला जात आहे. सार्वजनिक वापराच्या ठिकाणी फूड प्लाझा बांधणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम लवकरात लवकर थांबवावे. याचिकाकर्त्याच्या वतीने ऍड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.

Court
Nagpur : हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून बनविणार कमर्शियल गॅस; 300 कोटीत...

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही :

12 मे 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानात उभारण्यात येत असलेल्या फूड प्लाझाबाबत उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी करण्यात आली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार अर्जाची कोणतीही दखल न घेतल्याने ज्येष्ठ नागरिकांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com