Amravati : फिनले मिल लवकरच सुरु होणार कारण एनटीसी देणार 21 कोटींचा निधी

Amravati
AmravatiTendernama
Published on

अमरावती (Amravati) : अचलपूर येथील फिनले मिल नियमित सुरू करण्यासाठी 31 जुलै रोजी मुंबई येथे शासनाची बैठक झाली. 21 कोटींचा निधी एनटीसी देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठकीत दिली. केंद्रासह राज्य शासन सकारात्मक असल्याने फिनले मिल लवकरच सुरु होणार असल्याचे आमदर रवी राणा (Ravi Rana) यांनी यावेळी सांगितले.

Amravati
Nagpur : फडणवीस, गडकरींच्या नागपुरात चाललंय काय? 600 कुटुंबांचे घराबाहेर पडनेही का झाले मुश्किल?

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवी राणा, एनटीसीच्या सीएमडी प्राजक्ता वर्मा व सचिव रोहित कन्सल तसेच केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते. मिल सुरू करण्याबाबत राज्य सरकार आवश्यक ती मदत केंद्र शासनाला करावयास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितले. बैठकीत सीएमडी यांनी पगार सुरळीत देत असल्याचे मान्य केले. 34 महिन्यांचा राहिलेला 50 टक्के पगार देण्यात आला व उरलेला 50 टक्के पगार व बोनस लवकर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कामगारांच्यावतीने भाजप जिल्हा सदस्य अभय माथने, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, गिरणी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ अध्यक्ष छोटू ऊर्फ मनीष लाडोळे, उपाध्यक्ष राजा ठाकूर, प्रवीण तोंडगावकर, सचिन जिचकार आदींनी मुद्दे मांडले.

Amravati
Nagpur : महापालिकेला मिळणार का 87 कोटींचा निधी? अजून पहिलेच प्रस्ताव...

अमरावती शहरातील गोपालनगर येथील सूतगिरणी व बडनेरा येथील विजय मिल पुनरुज्जीवित करून पुन्हा सुरू करा, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी बैठकीत केली. फिनले मिल सुरू व्हावी, यासाठी सातत्याने गिरणी कामगारांनी लढा दिला. या कामगारांच्या लढ्याला नेत्यांनी साथ दिली. नवनीत राणा यांनी पुढाकार घेत 26 जून रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी मिल कामगारांच्या व्यथा, समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी फिनले मिल चालविण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले. आता ही मिल लवकरच सुरू होणार असून, बेरोजगार व उपासमारीशी झुंजत असलेल्या कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल. आतापर्यंत 14 कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com